tejaskamble

tejask_poem (instagram id)

Grid View
List View
Reposts
 • tejaskamble 16w

  तिला म्हणालो कविता लिहिणे अवघड नाही
  शब्द मांडणे सोपे असते तुला मांडणे नाही


  Tejas@@k✍️✍️

 • tejaskamble 25w

  के तुझे पाना यही तो मंजिल थी मेरी.
  पर, रास्ता मुझे खामोशी का अच्छा लगा.

  Tejas@@k✍️✍️

 • tejaskamble 25w

  चेहरा बोलतो आरशात माझा.
  आसवांशी असतो सवांद माझा.

  मांडला दुःखाचा खेळ रत्यावरी.
  समजतात लोक, तो व्यापार माझा.

  भेटले त्यांना रस्त्यात प्रेत माझे.
  चाळला त्यांनी अखेर श्वास माझा.

  ठेवली कट्यार त्यांनी स्वताचपाशी.
  राहिला होता,कालचा हिशोब माझा.

  मी असाच राहिलो अन ते गेले पुढे
  जीवनाशी पांगळा सुरू प्रवास माझा.

  Tejas@@k✍️✍️

 • tejaskamble 29w

  छळती माणसांचे चेहरे अजून काही
  पाहती राखेत माझ्या उरले अजून काही

  Tejas@@k✍️✍️

 • tejaskamble 30w

  का आजही होतो भास तुझा.
  काळजाला होतो त्रास तुझा.

  विसरलोच नाही ती वाट तुझी
  तरी पाय वळतो दारात तुझा

  किती बोलावे आरशास खोटे
  त्याला दिसावा चेहराच तुझा

  दुःखाला देईन आराम म्हणतो
  सुखाला नेमका आधार तुझा

  तोडले नाते तू माझ्याशी जरी
  कधी मीही होतो जीव तुझा

  Tejas@@k✍️✍️

 • tejaskamble 31w

  जीवनाचे सार सारे मांडून झाले.
  दुःखाला आतासे फेटाळून झाले.

  किती करावा आसवांनी खुलासा.
  जीवना यातनांचे सुरू प्रवास झाले.

  करती लोक ठोकून सलाम मजला.
  शिव्या शाप त्यांचे मजला देऊन झाले.

  पाहता पौर्णिमेच्या चंद्रास जेव्हा.
  जे पहायचे ते माझे पाहून झाले.

  मांडला जरी डाव शेवटी जीवनाचा.
  आयुष्याला माझे अखेर खेळून झाले.


  Tejas@@k✍️✍️

 • tejaskamble 33w

  सोडतात आपली कात माणसे
  का विसरतात खरी जात माणसे

  Tejas@@k✍️✍️

 • tejaskamble 35w

  कळे न सखे तुझे हे वागणे मला.
  आर्त बोलणे तुझे,भासते वेगळे मला.


  Tejas@@k✍️✍️

 • tejaskamble 37w

  होने से सब कुछ हो जाता है|
  पत्थर दिल या दिल पत्थर हो जाता है|

 • tejaskamble 38w

  तु वसंत माझा नाकारलास नाही तरी.
  का तुझ्यात मला भिजता येत नाही.

  तू माझ्या काळजावर वार केलास जरी.
  तरी मला पलटवार करता येत नाही.

  गुन्हा केलाच नाही तरी तू करावी शिक्षा!
  प्रिती तरी तुझी मला नाकारता येत नाही.

  खंत इतकीच होती तू प्रेम नाकारलेस माझे!
  आता कोणता पुरावा मला मागता येत नाही.

  ठीक आहे, सोडले आहेस मला तू जरी.
  तू प्रेम माझे खरे मला टाळता येत नाही.


  Tejas@@k✍️✍️