जळत आहे
हृदय जळत आहे
देश जळत आहे!
भरवसा हरवला
विश्व पेटले आहे !
©shirish_smile
shirish_smile
writer and poet
-
-
shirish_smile 19w
सजन
छत कधीचे टपटपणारे स्वप्नांसारखे अपुल्या !
हा अवेळी पाऊस वेडा, काढत बसतो खपल्या !
दूर कुठेतरी मम चंद्र उतरला, ऐकून आहे सारे !
कासावीस झाल्या चांदण्यांचे मी प्राशून घेतो वारे !
ओंजळीतून उचलून घ्याव्या प्राजक्तांच्या गारा !
अवतीभवती दवबिंदुतून उसळून येतो देहच सारा !
अर्ध मिटल्या काळोखातून नभी शोधत जावे तारे !
भरून घ्यावे तनामनातून शहारलेले चांदण वारे !
-#शिरीष
©shirish_smile -
shirish_smile 61w
अमलताश
सौंदर्य मागता आले तर
मी जन्म फुलांचा घेईन ।
सृष्टीवरती बहर उधळण्या
ऋतु वसंत पांघरुन येईन।
झाडांच्या वेणीत माळण्या
लाडका अमलताश होईन ।
-#शिरीष
©shirish_smile -
shirish_smile 61w
गाता फिरता
कोई तुम्हारे धून मे रेहता
मी जनमोंसे धून बनाता ।
लाखो देखे चाहनेवाले
मै सपनों को यूँ चुराता ।
खुदको तुम छोडो सजाना
मै तेरे गालोंपर मुस्कुराता ।
आ जाओ सब को छोडकर
हर राह मे तेरे मै हूँ आता ।
पूछते हो ,क्या करते हो ?
जिता हूँ मै गाता फिरता ।
©shirish_smile -
shirish_smile 63w
रंग
तू मला ना ओळखावे रंग असला भोवलेला ।
एकदा मी रंग माझा खूप सारा लावलेला ।।
मोरपंखी जाहली ती एवढा मी भाळलेला ।
लाजली मयुरी जराशी पंख प्यारा पाहिलेला ।
-शिरीष
©shirish_smile -
shirish_smile 63w
मश्कूर
__________________________________________
पुछ लिया गुलोंने ,आखीर कौन हो तुम इस गुलिस्तां के ?
बडी विनम्रतासे मैने कहाँ , जी कोई नही, बस मश्कूर हूँ मै
- #शिरीष
__________________________________________
मश्कूर =कृतज्ञ
©shirish_smile -
shirish_smile 63w
सुख म्हणजे
सुख म्हणजे मनातल्या कुहूकुहूची पहिली थरथर
सुख म्हणजे एक काॅफी दोन मग आणि ती
सुख म्हणजे आपली प्राजक्ताची ओंजळ पुढच्या ओंजळीत रिकामी करणं
नकळत हाती घेतलेला हात
एक सुखद प्रश्न , क्या वो भी चाहता है मुझे ?
सुख म्हणजे न खाता अर्धी जपून ठेवलेली कॅडबरी आणि जन्मभर जपून ठेवलेलं ते मनातलं मोरपीस
ते तस्सं तास तास रेंगाळणं
तिच्या दारातला सोनचाफा आणि आठवणीनं दिलेलं ते लोभस फुल
तो पाणीपुरीचा माठ
तो मध्यरात्री आलेला पहिला miss you चा मेसेज
चार डोळ्यांनी पाहिलेलं एक कोवळं स्वप्नं
केसात माळलेला तो गुलाब
आठवणींनी रात्रभर पसरवलेलं स्वप्नांवरचं बर्फाळ दव
सुख म्हणजे हरवून जाणं असं की अदृष्यच व्हावं जणू आणि पुन्हा सापडूच नये कुणाला कधीच. .
- शिरीष
©shirish_smile -
shirish_smile 63w
इस शाम गदगदाकर रोते रहे एतिकाफ।
कोई इश्शाक गर होता तो क्या होता ?
एहतिराज बस गये है एतिराज की घडी मे ।
कोई गया वापस आता तो क्या होता ?
जिंदा हूँ फिर भी कोई बिदअत नही रही ।
कल गर मै बिहिश्त जाता तो क्या होता ?
-#शिरीष
एतिकाफ = एकांत
उश्शाक = आशीक, प्रेयसी
बिहिश्त =स्वर्ग
एतिराज =संकट
बिदअत = नविन काहीच न होणं
एहतिराज = दूर निघून जाणे
©shirish_smile -
shirish_smile 63w
तीट
आठवे का लाजली माझ्यासवेही ।
संचिते ती लाडकी माझ्यासवेही ।
दृष्ट का लागेल कोणाची कशाला
तीट आहे लावली माझ्यासवेही ।
कोणत्या मंदिरात नाही ही कृपा जी,
माय घरट्या राहिली माझ्यासवेही ।
रेखले आहे तुझे हे चित्र जेव्हा
पण सरीता वाहिली माझ्यासवेही ।
पाहतो मी या फुलांचे बंद डोळे
वाटले की भांडली माझ्यासवेही ।
दृष्ट नाही लागणे शक्य आता
तीट तुजला लावली माझ्यासवेही ।
भांडणे आहेत बाकी या फुलांची ,
पण कुणी धमकावली माझ्यासवेही ?
-#शिरीष
©shirish_smile -
shirish_smile 63w
एक ओळ तू ..
एक राधा माझ्यामधूनी अवखळ वाहते पाहून घे
वाचता वाचता उत्तरातली एक ओळ तू लिहून घे
लिहीता लिहीता शब्द सारे थकून संपतील पण
डोळ्यामधला अथांग सागर वाहतो तो वाचून घे
पापणीने लिहीले जाते श्वासांचेही सारे आर्जव
अक्षरांच्या अधीर पापण्या पुसता पुसता स्पर्शून घे
काय तुला मी लिहीले तेव्हा काही ठाऊक नाही
त्या शब्दामधूनी उरे तुझा मी एवढेच तू समजून घे
हातावरती ठेव हात तू पत्र माझे वाचत असता
अक्षरांचे कंपन तेव्हा थरथरण्यातून जाणून घे
-शिरीष
©shirish_smile
-
Anticipations fade away our dreams
©saitulasi
