Grid View
List View
Reposts
 • sagar_09 40w

  #sgr09

  क्षणभंगुर !

  शब्द कशाला माणसाचा
  मी अपुला कुत्रा पाळतो ,
  थेंब हवा कुणा पावसाचा
  मी अपुला अश्रू ढाळतो !

  फुलं कशा देवा चढवू
  मी माझा जीव माळतो ,
  तेल फुका पणतीत ठेवू
  मी माझा मला जाळतो !

  वर्षा कामाची देह भिजला
  आत्मा उगा एकटा वाळतो ,
  काळ कधीचा दारी आला
  आत्मा उगा वेळ टाळतो !

  चाळण झाली पुरती माझी
  तरी अजूनही व्यर्थ चाळतो ,
  निजली निवांत काया माझी
  तरी अजूनही रक्त गाळतो !
  ©अज्ञातवासी

  Read More

  .

 • sagar_09 41w

  वरात दे !

  सोयीनुसार सदैव साथ दे
  मरणोत्तर सोडून कात दे !

  जमेल तेव्हा हसून पाहा
  खुशाल दुःखाला दात दे !

  घिरट्या मार तुटून पड
  समोरासमोर ती मात दे !

  जप रे नशिबाच्या ओव्या
  अखेरीस कर्माला हात दे !

  चालू राहूदे मुखवटे डाव
  पाठोपाठ सदैव घात दे !

  किरणे बिछाना नव्हे ऊन
  उशाशी स्वप्नांची रात दे !

  जरूर नाचेल मीही तेव्हा
  एक शेवटची वरात दे !
  ©अज्ञातवासी

 • sagar_09 60w

  #sgr09

  अज्ञानी - ज्ञानी - आत्मज्ञानी - सदगुरू कृपे !

  Read More

  अज्ञानी !

  मावळला सुर्य
  संगतीला चंद्र
  तरी का हा जीव
  अज्ञानी अंधारात !

  काळोखाचा वारा
  भयाचा सुगंध
  मानवी हा देह
  भ्याड नपुंसक !

  किती काय बोला
  किती काय सांगा
  करी खरे स्वतःचे
  कोटीचा हो मूढ !

  चाले वेडेवाकुडे
  करी दुःखाशी सलगी
  सोयीनुसार करी
  आपली सोयरे निश्चित !

  भाग्य म्हणे माझे
  कर्म न तो करी
  रिताच तो राही
  विना आत्मज्ञानी !
  ©अज्ञातवासी

 • sagar_09 60w

  येण्याने तिच्या !

  नकळत होऊन जाते
  नाते नवेच बनू लागते ,
  ओठांवरती आपल्या मग
  हसू नवेच खुलू लागते !

  सारे जग आपणास
  निराळेच भासू लागते ,
  येण्याने कोणाच्या
  आपले जीवनच बदलू लागते !

  आरश्याशी आपली मैत्री
  हल्ली घट्ट होऊ लागते ,
  काव्यमय सारेच मग
  आपणास वाटू लागते !

  मुकपणेच संवाद साधणे
  आपणासही जमू लागते ,
  येण्याने कोणाच्या
  आपले जीवनच बदलू लागते !

  रंगहीन चित्रही आपणास
  रंगीत ते दिसू लागते ,
  कोमजलेले ते फुलही
  पुन्हा नव्याने उमलू लागते !

  अवकाशापरी जीवनात आपल्या
  नवीच चांदणी चमकू लागते ,
  येण्याने तिच्या
  आपले जीवनच बदलू लागते !
  ©अज्ञातवासी


  #sgr09

  Read More

  ।। येण्याने तिच्या ।।
  ( मथळा पाहा )
  ©अज्ञातवासी

 • sagar_09 60w

  " विसावा ! "

  नऊ महिन्यांच्या शोधानंतर
  अस्तित्वाचा सुगावा लागतो ,
  जन्मताच आपल्याला मग
  आवाज रडण्याचा करावा लागतो !

  पडत पडत , रांगत रांगत
  धडा जीवनाचा शिकावा लागतो ,
  काहीएक करण्याआधी
  चटका तव्याचा लागावा लागतो !

  पहिले पाऊल टाकण्यासाठी
  आधार भिंतीचा घ्यावा लागतो ,
  बोबडे बोल उच्चारण्यासाठी
  आवाज श्रीचा ऐकावा लागतो !

  एकदोन अन् बाराखडी सोबत
  घास गणिताचा खावा लागतो ,
  रडत रडत मग आपणास
  मार्ग शाळेचा धरावा लागतो !

  मित्र मैत्रिणी अन् शिक्षक
  आदर नात्यांचा राखावा लागतो ,
  हसत खेळत आपणास तो
  संवाद प्रेमाचा साधावा लागतो !

  होते कॉलेज मिळते डिग्री मग
  मांडव लग्नाचा उभारावा लागतो ,
  एकमेकांच्या मग सोबतीने
  रथ कुटुंबाचा ओढावा लागतो !

  असेच कायम दौडत राहून
  आवाज टापांचा करावा लागतो ,
  अंती मात्र आपणास हो
  श्वास अखेरचा मोजावा लागतो !

  गेल्यानंतर आपणास मग
  विधी स्वतःचा पाहावा लागतो
  सरण्यावरच्या ह्या प्रवासात
  आधार "विसाव्याचा" घ्यावा लागतो !
  ©अज्ञातवासी


  #sgr09

  Read More

  ।। विसावा ।।
  ( मथळा पाहा )
  ©अज्ञातवासी

 • sagar_09 60w

  भटकंती !

  वाट अंधारी , कोणास तारी
  लाट किनारी , सर्वांस मारी !

  रक्ताच्या गाठी , कडवट नाती
  पोकळ लाठी , होतेच माती !

  क्षणात इथे , क्षणात तिथे
  सर्वची रिते , सर्वची रिते !

  खोटा विचार , खोटा संसार
  देई हुंकार , देई हुंकार !

  चेहऱ्यावर मुखवटा , किती रंगछटा
  खालीची राहतो , आयुष्याचा ओटा !

  गारच वारा , आठवणींच्या गारा
  कुणाचा असतो , मनावर थारा !

  जायी हिंडावया , पाय बावळी
  नित्यची फसवे , मन चांडाळी !

  अवगुणी देह , सदगुणी कोण
  संत म्हणती , तुच ओळख !

  अंतरीच देव , तरी धडपड
  व्यर्थ भटकंती , तुझी वणवण !
  ©अज्ञातवासी

 • sagar_09 60w

  आपलं म्हणणार असावं !

  कधीतरी वाटतं आपलंही ते पहिलं
  आणि शेवटच प्रेम असावं ,
  कधीतरी वाटतं आपल्यालाही कोणीतरी
  आपलं म्हणणार असावं !

  कधीतरी वाटतं असावं आपलंही कोणीतरी
  ज्याला फक्त आपल्यातच त्याच विश्व दिसावं ,
  ज्याच्यासाठी आपणही दिवसरात्र झुरावं
  न सांगता त्यानेही आपल्या मनातलं सारं ओळखावं !

  कोणीतरी आपलीही घरी वाट बघत असावं
  त्याच्यासाठी आपणही लवकर काम आवरावं ,
  आयुष्याचे गीत दोघांनी मिळून सुरेल बनवावं
  अलगद आपण त्याचच ते होऊन मग जावं !

  त्याच्या सोबतचा प्रत्येक क्षण ह्रदयात साठवावा
  नजरे नजरेतच एकमेकांशी संवाद प्रेमळ साधावा ,
  मुकपणेच कित्येक संभाषणे आपली व्हावी
  शब्दांची उणीव कोणास कधी न ती भासावी !

  कधीतरी वाटतं आपलंही ते पहिलं
  आणि शेवटच प्रेम असावं ,
  कधीतरी वाटतं आपल्यालाही कोणीतरी
  आपलं म्हणणार असावं !
  ©अज्ञातवासी


  #sgr09

  Read More

  आपलं म्हणणार असावं !
  ( मथळा पाहा )
  ©अज्ञातवासी

 • sagar_09 60w

  आलाप !

  नवी पहाट नवीच आशा ,
  उजळून गेल्या दाही दिशा !

  निळे आकाश निळाच सागर ,
  सोन्याने सजला धरणीचा नांगर !

  सोनेरी किरणे धरणीवर आली ,
  वसुंधरा पुर्णतः सुवर्णमय झाली !

  झाले चैतन्यमय वातावरण सारे ,
  समृद्धीचे वाहले मग वारे !

  काळोखाचा तो अंत झाला ,
  भटका जीव शांत झाला !

  सारेजण एकत्र हो आले
  तारे भूमीवरच चमकू लागले !

  हातात दिला जेव्हा हात
  विश्वासाचा झाला मिलाप ,
  एकाच सुरात गायला तेव्हा
  एकजुटीचा तो आलाप !
  ©अज्ञातवासी

 • sagar_09 60w

  हनुमान !

  गेलेला भूत , येणारा भविष्य , चालू मात्र वर्तमान असे
  क्षणात घडे क्षणात बिघडे , काळ भलताच गतिमान असे !

  नाना तऱ्हेचे जीव क्षितीवर , नवखंड अन् सप्त ते सागर
  एक तिथे संशयाचा पुतळा , मूढ अज्ञानातच रममाण असे !

  निळा रंग , विशाल महाकाय , अथांग असा तो महासागर
  शांत दिसला किती जरी , अंतरी लाटांचा थैमान असे !

  मोहाच्या वाटा अनेक इथे , मोह त्यांचा कदापि न सुटे
  अवकाळी पाऊस , तडाखा ऊन्हाचा , भ्रमिष्ट सारे हवामान असे !

  चार भिंतीच्या आत लपून , कित्येक वार करतात विषय
  त्यांना ही जो हरवून दाखवी , तोच खरा शक्तिमान असे !

  बदलले आहे चक्र सारे , उधळे चित्रविचित्र रंग चोहीकडे
  कोण भाऊ न् कोण दादा , कशाचा इथे अनुमान असे ?

  कलियुगाच्या ह्या जाळ्यात , कैक आपला श्वास आवळे
  एक तेथे निर्धास्त चाले , तो भक्त रामाचा "हनुमान" असे !
  ©अज्ञातवासी

 • sagar_09 60w

  हाव !

  कितीही काही झाले तरी , फरक कोणाला पडत नाही
  सोडून गेला कोणी जरी , कोणाचे काही अडत नाही !

  निरंतर धावण्याचा खेळ , अवघा असाच चालू राहतो
  सडले एखादे फळ जरी , सबंध झाड काही सडत नाही !

  सात्त्विकाला येथे मतिमंद म्हणतात , म्हणतंही असतील
  मतिमंद ते सारेच आहे , जे कोणासाठीही रडत नाही !

  भंगली स्वप्ने , सुटले हात , सुटले सारेची आता
  शेवट निकट आला जरी , मनासारखे काही घडत नाही !

  कितीही टाळे लावले , कितीही खोलात फेकले आपण
  तरी सत्य जीवनाचे ह्या , काहीएक दडत नाही !

  वृद्ध झाले , थकले आता , दुरावले सारे आप्तेष्ट
  तरी ती "हाव" आतली , ती काही झडत नाही !
  ©अज्ञातवासी