s_s_parab

लेखन जीव तर शब्द श्वास !

Grid View
List View
 • s_s_parab 136w

  छाप

  काही करावे असे
  जरा पडू दे प्रभाव
  अन् केले जरी हवेसे तरी
  सदा असेलच अभाव
  तुझी तू सोडून जाणार छाप
  मग भले पुण्य असो वा पाप

  ©s_s_parab

 • s_s_parab 138w

  खरं तर,
  माझ्या घरच्या मंडळींनी सर्व काही दिलं
  आणि
  जमेल तेवढं देतीलही
  फक्त...
  काळानुसार माझ्याच अपेक्षा वाढत आहेत.

  ©s_s_parab

 • s_s_parab 142w

  #एक सोबती #one mate

  Read More

  वाटते ना
  मलाही खूप काही वाटते
  तुलना केली तरच ...
  आणि नाही तर...
  सारे व्यर्थच.
  म्हणजे अगदी
  माझ्या जवळ सतत असावं कुणीतरी
  माझे सर्व सुख-दु:ख वगैरे ऐकायला
  माझी समजूत घालायला
  मला एखादी संधी द्यायला
  आवडेल की मग रुसायला
  जसा मी त्यावरी अन् तो मजवरी
  अवलंबला तरी चालेल त्याला-मला
  मिळू दे फक्त असा एक साथी
  जो की पाठीशी नव्हे तर सोबत असेल
  त्याच्या शब्दांतूनच माझंही बळ वाढेल
  मग अगदी प्रत्यक्षपणाची गरज नसेल
  त्याच्या नावातही मैत्रीचा गंध असेल

  ©s_s_parab

 • s_s_parab 143w

  समोर घडणार किंवा घडलेलं सगळंच काही
  कागदावर उतरवता येत नसतं
  आणि
  कागदावरील मजकूर वाचून
  समोर दृश्य उभं राहतं नसतं
  सगळं इतकं सोपं तरी नसतं...
  काही गोष्टी खूप पल्याड असतात...
  कल्पनेच्या
  आणि
  नजरेच्याही!
  ©s_s_parab

 • s_s_parab 143w

  #आठवण #आठवणी

  Read More

  आठवण

  आपण आठवणी कैद करत सुटतो.
  त्या आधी तर नजरेतून आणि कॅमेरा त्यासाठीच बनवला आहे ना!
  पण यापलीकडेही खूप अनमोल असा आठवणींचा साठा सांभाळून ठेवतं,
  ते म्हणजे आपले मन.
  आणि या आठवणी आपण फक्त आपल्या जवळीक,
  विश्वासू व्यक्तींना सांगतो.
  असं का बरं??
  तर ती व्यक्ती किंवा तशी परिस्थिती आलीच नाही तर मग त्या आठवणी तशाच मनाच्या अडगळीत पडूनच राहतात, शिवाय बोचतात ती गोष्ट वेगळीच.
  ©s_s_parab

 • s_s_parab 159w

  #नववर्ष #new year

  Read More

  नववर्ष

  रोज अगदी रोज
  झोपेतून होता जागा
  स्वागतास उभी असते ती
  एक नवी पहाट सोबतीस तिच्या
  एक नवी पल्लवी आशा,
  एक नवा चैतन्य-उत्साह आणि
  घडणारा हा नवा देहही
  म्हणजेच एक नववर्ष
  इतकाच पुरे हो तो हर्ष
  जगण्यासाठी व जगविण्यासाठी सुद्धा...

  ©s_s_parab

 • s_s_parab 165w

  रूळ रेल्वेचा अन् प्रवास मैलोमैलांचा..


  ©s_s_parab

 • s_s_parab 170w

  शंका घेतो मीच स्वतःवर
  तर विश्वास कसा ठेवू
  आणि तो नक्की कोणावर..??

  ©s_s_parab

 • s_s_parab 171w

  गणित

  दिवस सरतो तसाच सरून गेला..
  मी वेळेचं गणित करत बसलो...

  ©s_s_parab

 • s_s_parab 171w

  #रस्ता #स्वमार्ग #path #writersnetwork
  @pallavi_b

  Read More

  रस्ता

  घडून गेलेलं आज आठवतं
  आज करू ते उद्या आठवेल
  मग उद्याचं आजच आठवून
  का टाकता स्वतःला मारून?..
  ठरवलं तसे होत नसतं
  अन् जे होतं ते अपेक्षित नसतं
  जे होणार ते कसेही होणार
  मिळणारे असेल तर तेच मिळणार
  तुम्ही फक्त सहन करा
  जिद्द ठेवा मेहनत सोडू नका
  कुणीतरी बनवला आहे रस्ता
  त्यावर तरी चाला
  नाही तर स्वतःचा रस्ता बनवा