rohan_sakhare

Singer,Lyricist,Composer... Instagram(rohan_sakhare95)

Grid View
List View
Reposts
 • rohan_sakhare 67w

  ❤️Dil Aashiq Zaylay Go❤️

  ::::दिल आशिक झायलाय गो::::
  हो..राणी दर्याची, पोर कोल्याची, मासोली हाय ही समीनदाराची(Chorus)
  .........................Male...............................
  नखरेल नार तु पोरी दिसतंस कमाल, केली दिलावरी तु गो जादू हाय,
  जश्या ह्या भिडती या लाटा दर्यावरी,तशी तु माझ्या मनानं भिडली हाय,
  तुझा नाद मनाला लागला हाय,दिल आशिक तुझा ह्यो झायला हाय...
  तुझा नाद मनाला लागला हाय,दिल आशिक तुझा ह्यो झायला हाय...।।धृ.।।
  ........................male............................
  तु येतान समोर माझे पोरी,माझे दिलाची करतेस चोरी
  तुझ्या एका इशाऱ्यावरी,Heartbeat माझी धकधक करी,
  नखरा तुझा असा करी येरापिसा...
  नखरा तुझा असा करी येरापिसा,जीव माझा तुझ्यावर जडला हाय....
  तुझा नाद मनाला लागला हाय,दिल आशिक तुझा ह्यो झायला हाय...।।1।।
  ............................Female........................
  बेभान वार्‍यात दर्याच्या तालात,
  बेधुंद चढली प्रित तुझी...
  चांदण्या राती रे तु माझा साथी रे
  झायलेय मी नाखवा दिवाणी तुझी...
  तुझी आस उरी ही लागली हाय,
  दिल आशिक तुझा ह्यो झायला हाय...
  तुझा नाद मनाला लागला हाय,(Male)
  दिल आशिक तुझा ह्यो झायला हाय...(male)...।।2।।
  ©रोहन साखरे & वैशाली म्हस्के.
  ..............................................................

 • rohan_sakhare 73w

  आरंभी गजानना

  विद्येचा दाता अन भक्तांचा त्राता,
  माझा L.I.G.चा राजा...
  बेल फुल वाहून करतो नमन मी तुजला,
  तु बाप्पा दयाघना..
  जयघोष हा घुमतो साऱ्या नभी, तुझे नाम हे स्मरतो माझ्या मनी,
  तुझी स्वारी ही आली माझ्या घरी मोरया....
  तुझं वंदू देवा आरंभी गजानना,तुझं वंदू देवा आरंभी गजानना...||धृ.||
  ................................................................................
  तुझ्या आरतीची देवा झाली तयारी,
  तुझ्या माथ्यावर शोभे मुकुट भारी,
  माथा ठेवतो मी तुझ्या पायावरी,
  देवा सृष्टी ही आज सजली सारी....
  साऱ्या देवांचा देव तु सिद्धिविनायका....
  तुझं वंदू देवा आरंभी गजानना,तुझं वंदू देवा आरंभी गजानना...||१.||
  ................................................................................
  मंगलमूर्ती तु असा साऱ्या विश्वाचा कर्ता ,
  स्वागतासाठी त्याच्या वाजे ढोल आणि ताशा,
  नभ कडाडती सारे दूर अंधार हा लोटला,
  रूप राजाच गोजिर डोळा भरून पाहिला...
  तु गणाध्यक्ष तु वरदविनायका...
  तुझं वंदू देवा आरंभी गजानना,तुझं वंदू देवा आरंभी गजानना...||२.||

  ©रोहन साखरे.
  ©Rohan_Sakhare

 • rohan_sakhare 73w

  गणांचा अधिपती

  तुच माझी माऊली अन तुच माझा श्वास हा,
  तुझ्या मायेचा हा देवा लाभूदे सहवास हा,
  तु दिनांचा कैवारी,तुझी स्वारी उंदरावरी,
  शोभे मुकुट माथ्यावरी,तुझी महिमा ही रे न्यारी,
  गणांचा अधिपती तु माझा गणपती
  गणांचा अधिपती तु माझा गणपती...||धृ.||
  ................................................................................
  संकट हे दाटले ठेव हात शिरावरी,
  पिवळा पितांबर शोभे भरजरी,
  दर्शनास आलो तुझिया तु कृपेची सावली,
  जयघोष तुझिया नामाचा बाप्पा घुमतो आभाळी,
  तु दिनांचा कैवारी,तुझी स्वारी उंदरावरी,
  शोभे मुकुट माथ्यावरी,तुझी महिमा ही रे न्यारी,
  गणांचा अधिपती तु माझा गणपती
  गणांचा अधिपती तु माझा गणपती...||१.||
  ................................................................................
  आरती ही सजली पंचामृताची,
  सुखकर्ता मोरया चिंता हरतो जगाची,
  डोळे वाट पाहती तुझ्या आगमनाची,
  गोड तुझे रूप देवा काय महिमा वर्णू त्याची,
  तु दिनांचा कैवारी,तुझी स्वारी उंदरावरी,
  शोभे मुकुट माथ्यावरी,तुझी महिमा ही रे न्यारी,
  गणांचा अधिपती तु माझा गणपती
  गणांचा अधिपती तु माझा गणपती...||२.||

  ©रोहन-साखरे.
  ................................................................................
  ©Rohan_Sakhare

 • rohan_sakhare 73w

  ❤️Naav Doltay Go⛵

  :::: नाव डोलतय गो::::
  तुझ्या पिरतीचा वारा असा अंगानं भिनलाय गो,
  तुला पाहुनी पारु कसा जीव बघ भुललाय गो,
  तुझ्या पिरतीचा वारा असा अंगानं भिनलाय गो,
  तुला पाहुनी पारु कसा जीव बघ भुललाय गो,
  ह्यो नखरा कमाल, तुझी चाल बेमीसाल,
  अदा तुझी अशी घायल करतंय गो....
  नाव डोलतय गो डोलतय गो आपले ईशकाची दर्यावरी,
  नाव डोलतय गो डोलतय गो आपले ईशकाची दर्यावरी..।धृ.।।

  ..........................Male....................................
  जीव तुटतंय गो तुझेसाठी,भरती येतंय किनाऱ्याला,
  वाट बघतंय मी कवापासूनशी, तु गो येशील बंदराला
  तु गो रूपाची खाण,करी दिल बेहाल,
  नथ नाकान तुझ्या ही शोभतंय गो....
  नाव डोलतय गो डोलतय गो आपले ईशकाची दर्यावरी,
  नाव डोलतय गो डोलतय गो आपले ईशकाची दर्यावरी..।।१.।।
  ..............................Female.........................
  प्रेम जन्माचं देईल राजा तुला मी र,
  राणी होऊनशी येईल तुझे मी घरा र,
  हात माझा तु हाती घेऊनशी,
  मना फिरव मुंबई किनारा,
  आपले दोघांच्या भारी जोरीला,
  सारा बघल ह्यो कोळीवारा,
  तुझी माझी ही डोर, मी र कोल्याची पोर,
  जीव माझा तुझ्यावर जडलाय र....
  नाव डोलतय गो डोलतय गो आपले ईशकाची दर्यावरी,
  नाव डोलतय गो डोलतय गो आपले ईशकाची दर्यावरी..।।२.।।

  ©Rohan_Sakhare.
  ................................................................................

 • rohan_sakhare 77w

  साहिबा

  तूच माझी सावली ही उन्हातली,
  तूच आनंद सारा दाटे मनी...
  तूच माझी सावली ही उन्हातली,
  तूच आनंद सारा दाटे मनी...
  तु माझी जिंदगानी,तु माझा श्वास हा,
  तुजविण मी अधुरा हो माझा साहिबा...(2 Times). ||धृ.||
  ...............................................................................
  नसता तु समोरी,ओढ लागे या मनाला..
  मिठीत या तुझ्या मी,द्यावे हरवून ग स्वतःला..(2Times)
  तु माझी जिंदगानी,तु माझा श्वास हा,
  तुजविण मी अधुरा हो माझा साहिबा...।।1।।
  ...............................................................................
  धुंद राती तारकांनी सजवावे या नभाला..
  तसे तु ग जराशी,मोहरावे या क्षणांना..(2 Times)
  तु माझी जिंदगानी,तु माझा श्वास हा,
  तुजविण मी अधुरा हो माझा साहिबा...।।2।।
  ................................................................................
  ©Rohan_Sakhare

 • rohan_sakhare 77w

  हिरव्या पानांन

  कोवळीशी नाजूक बांध्याची,जलपरी तु पोर नखवाची(Chorus Starting)
  ...............................................................................
  कळला पोरी कळला..
  सखे तुझा इशारा गो कळला..
  भिनला पोरी भिनला..
  रूप तुझं ह्या मनानं हेरला..
  आता राहू नको अशी दूर गो तू,
  जे हृदयान हाय ते कर गो कबूल..
  तुझा छंद जीवाला लागला हाय...
  हिरव्या पानानं हिरव्या पानानं रूप तुझं हे सजल हाय..
  हिरव्या पानानं हिरव्या पानानं रूप तुझं हे सजल हाय..
  तुझ्या इशकाच्या जाळ्यामंदी नाखवा पुरा आता ह्यो फसला हाय...||धृ||
  ..............................Male................................
  वादळ सुटलाय गो इशकाचा,
  आपले दोघांचे पिरमाचा....
  तुझ्या ओठांच नाजूक हसणं,
  ताबा घेतंय माझ्या दिलाचा...
  रंग नवा ह्यो हाय पिरतीचा,
  आपले दोघांचे जीवनाचा....
  खुळ झालंय मन हे माझं,
  जीव जडलाय तुझेवर माझा....
  रूप तुझं ह्या मनानं भरलाय,कशी झायली ही जादू....
  रूप तुझं ह्या मनानं भरलाय,कशी झायली ही जादू....
  हिरव्या पानानं हिरव्या पानानं रूप तुझं हे सजल हाय..
  हिरव्या पानानं हिरव्या पानानं रूप तुझं हे सजल हाय..
  तुझ्या इशकाच्या जाळ्यामंदी नाखवा पुरा आता ह्यो फसला हाय...||1||
  .................................Female.........................
  तुझ्या संगतीनं मन नादावलं...
  तुझ्या मिठीमंदी वेडं विसावलं..
  ओठी तुझंच रेनाव गुणगुणलं...
  का शहाऱ्यांनी हे मन मोहरलं......
  जन्मभराच्या पिरतीसाठी जुळल्या आपुल्या रेशीम गाठी तुला कळला इशारा नाखवा मी आयलेय रे तुझ्याचसाठी.. तुला कळला इशारा नाखवा मी आयलेय रे तुझ्याचसाठी..
  हिरव्या पानानं हिरव्या पानानं रूप तुझं हे सजल हाय..
  हिरव्या पानानं हिरव्या पानानं रूप तुझं हे सजल हाय..
  तुझ्या इशकाच्या जाळ्यामंदी नाखवा पुरा आता ह्यो फसला हाय...||2||
  .........................................................................
  ©Rohan Sakhare & Vaishali Mhaske

 • rohan_sakhare 95w

  तुझ्यावर प्रेम

  छेडता तुला जरासे,
  तुझा रुसवा ही झेलतो...
  ओंजळीतल्या फुलाप्रमाणे,
  तुझ्या प्रत्येक श्वासाला मी जपतो...

  सांगतील तुला खूप सारे,
  की आत्ताच विचार कर,
  जो दिसतो तसा नसतो...

  पण एक सांगेल तुला,
  जगाचा विचार एका बाजूला सारून,
  मी मात्र तुझ्यावरच प्रेम करतो....!
  ©Rohan_Sakhare

 • rohan_sakhare 96w

  संवाद

  कदाचित खूप काही बोलायचंय,
  मला माझ्याकडून आणि तुला तुझ्याकडून,
  खूप काही सांगायचंय.....!
  दोघांमध्ये कुठेतरी संवाद अपुरा पडतोय,
  त्यामुळेच कधीकधी वेळ दोघांकडे असून देखील,
  आधी तू आणि नंतर मी,
  हे करण्यातच आपला वेळ दवडतोय...!
  ©Rohan_Sakhare

 • rohan_sakhare 97w

  एक कवी

  कसं असत ना कधीकधी,
  आवर घालावा लागतो स्वतःच्या भावनांवर...
  डोळ्यात अश्रू जरी दाटले तरी,
  दगड ठेवावा लागतो स्वतःच्या मनावर...
  ठेच तर लागतेच जीवाला,
  जेव्हा कुणी नसतं सावरायला आपलं बोलणं ऐकून घ्यायला...
  त्यावेळी असह्य झालं की एका कवीला,
  त्या भावना व्यक्त कराव्याच लागतात एका कागदावर...!
  ©Rohan_Sakhare

 • rohan_sakhare 97w

  भीतीचे काहूर

  आज बरेचसे क्षण,
  माझ्या नजरेसमोर येत होते..
  तोंड मात्र गप्प,
  नि डोळेच आज खूप काही सांगत होते..
  एका ठिकाणी शांत बसलेला मी,
  आज तिथे देखील तुझे भास होत होते..
  का जाणे हे कळतं नाही,
  मनात आज भीतीने काहूर माजवले होते..
  ©Rohan_Sakhare