• sandesh_poetry 105w

  जगावं म्हटलं

  या ना त्या कारणाने
  रोजच रडणाऱ्याने
  आज थोड हसावं म्हटलं
  फुकटात अश्रु पिणाऱ्याने
  आज थोड्याशा सुखाला
  विकत घेत चाखावं म्हटलं
  मनाची शांती हिरावणाऱ्या
  या असमाधानी मनाला
  थोडसं समाधान द्याव म्हटल
  माझं माझं म्हणत खूप जगलो
  आपलं म्हणून सोबत जगावं म्हटलं
  जीवनाच्या कर्तव्याच्या उन्हात
  आणि निद्रनाश राञींत खूप खपलो
  पुन्हा आईच्या कुशीत विसावं म्हटलं
  त्या निरागस लहान बालकाप्रमाणे
  नेहमी स्वच्छंदी आनंदी जगावं म्हटलं
  ©sandesh_poetry