• patilmrunali 98w

  बाकी आहे..!

  जीवन संपल नाही
  गगनभरारी बाकी आहे
  तू साध्यकर्ता,
  तुझी ललकार बाकी आहे

  उरी बाळगली ऊर्जा
  त्याची हुंकार बाकी आहे
  तू साध्यकर्ता,
  तुझा आविष्कार बाकी आहे

  बळ आहे हाती
  मस्तकाची परीक्षा बाकी आहे
  तू साध्यकर्ता,
  तुझा विजयतीलक बाकी आहे

  मनी जे विचार
  त्याची विचारणा बाकी आहे
  तू साध्यकर्ता,
  तुझा जयघोष बाकी आहे

  ©patilmrunali