• the_amour 53w

  भेट

  अबोल तू अन स्तब्ध मी
  पाहून तुला मी पुन्हा बावरली

  वार्ता तुझ्या अन माझ्या भेटीची
  नभांगणी सर्वत्र पसरली

  भरून आल्या भावना हृदयी
  मेघ अवचित आकाशी दाटली

  संवाद आपला ऐकून
  अवनी ही शहारली

  विस्मित होऊन बघती वृक्ष वेली
  जणू मुकी पाखरे बोलली

  ©the_amour