• the_amour 53w

  मन हे बावरे

  मन हे बावरे हिंडते चहूकडे
  मी मलाच हरवून बसले
  जाणीव मला न हर्षाची न दुःखाची
  मी मलाच शोधीत फिरते

  मन हे धावते मृगजळासारखे
  मोहक फुलांचा गंध नेतो जिकडे
  वाटेत माझ्या पायी रुततात काटे
  मग मोती शिंपल्यातून गालावर निसटते

  रेशीम सारी पावसाच्या
  वर्षाव तो जलधारांचा
  वाहून नेई भाव सुखाचे
  दुःखाच्या लाटा

  रात्रीचा अंधार अन विजेचा कडकडाट
  मन हे बावरे पाहते चंद्राची वाट
  वाट पाहता चंद्राची मी निजूनी गेले
  पहाटे सूर्य किरणांनी नावीन्य पसरले

  हिंडता हिंडता मज जवळी आले
  मनाला माझ्या मीच कवेत घेतले
  वाट सुखाची मज सामोरी
  पाहून पाऊल पुढे टाकले

  ©the_amour