patilmrunali

follow me on insta:- @poetic_mrunali

Grid View
List View
Reposts
 • patilmrunali 82w

  बाकी आहे..!

  जीवन संपल नाही
  गगनभरारी बाकी आहे
  तू साध्यकर्ता,
  तुझी ललकार बाकी आहे

  उरी बाळगली ऊर्जा
  त्याची हुंकार बाकी आहे
  तू साध्यकर्ता,
  तुझा आविष्कार बाकी आहे

  बळ आहे हाती
  मस्तकाची परीक्षा बाकी आहे
  तू साध्यकर्ता,
  तुझा विजयतीलक बाकी आहे

  मनी जे विचार
  त्याची विचारणा बाकी आहे
  तू साध्यकर्ता,
  तुझा जयघोष बाकी आहे

  ©patilmrunali

 • patilmrunali 82w

  कधी सूर्याचा उदय व अस्त डोळे भरून पाहशील,
  शिवबाच्या स्वराज्याचा रंग नाही दिसला तर म्हण..
  कधी पक्ष्यांची भूपाळी ऐकून पाहशील,
  मनाला शांती नाही मिळाली तर म्हण..
  कधी शाळेतील मुलं लगबगीत बसमध्ये चढताना पाहशील,
  बालपणात गेल्याचा आनंद नाही झाला तर म्हण..
  कधी पावसाचे थेंब बोटांवर झेलून पाहशील,
  तो तुझ्यात मिसळला नाही तर म्हण..
  कधी चहापत्ती विरघळताना पाण्याचा रंग बदलताना पाहशील,
  कुतुहलासोबत विज्ञान एकत्र झाल नाही तर म्हण..
  कधी पेपर अन दूधवाल्याला समजून पाहशील,
  नातं नसताना नातं असल्यासारखं नाही वाटलं तर म्हण..
  कधी सृष्टीचा तू एक भागच आहेस अस म्हणून पाहशील,
  एकटेपणाची भीती संपली नाही तर म्हण..
  कधी खऱ्या सुखाचा शोध घेण्याचा प्रयत्न करून पाहशील,
  जीवन खूप सुंदर आहे असं नाही जाणवलं तर म्हण..

  ©patilmrunali

 • patilmrunali 82w

  जुना मी, आजचा मी

  वर्गात पहिला येणारा
  आज दूर शेवटी थांबलाय..
  कालपर्यंत मित्रांच्या घोळक्यात बसलेला
  आज एकटा कोंडून पडलाय..
  सदानकदा अविचारी बोलणारा
  आज विचारांची काळजी करत बसलाय..
  निवांत स्वप्नांत विद्यमान असलेला
  आज त्यात विचारशून्य झालाय..
  ज्याच्या हुशारीच्या चर्चा रंगायच्या एकेकाळी
  आज तो पडद्याआड लपलाय..
  अर्थ निरर्थक शोधू शोधू
  आज अखेर त्याला गर्दीत गमावलाय..

  ©patilmrunali

 • patilmrunali 83w

  जाने कितने राज
  दफन किये हूं
  इस सिने में

  जाने कितनी कडवी यादे
  छुपके बैठी है
  इस जिने में

  कितने तो अरमान
  बंद पडे होगे
  अबतक तैखाने में

  मिलों चल आये
  पिछे दाल कई
  कचरे के ढेरों में

  ©patilmrunali

 • patilmrunali 84w

  पुनःश्च विचार

  काळीज दाटून आलं एका विचाराने..
  कधीच जाणलं नाही आपण शिकलो कोणत्या ध्येयाने..?

  बे चे पाढे, भूमिती, बीजगणित शिक्षणात होत..
  भोगोलिक नकाशा, अर्थशास्त्र इत्यादी कळतच तर नव्हतं..

  वरची पायरी चढत चढत डिग्रीच्या पायथ्याशी आलो..
  तेव्हाही नाही कळले की आपण तर पार गेलो..

  मराठी, इंग्रजी ही सुद्धा नीट नाही आपली..
  काणा, मात्रा, टेंसेसची हेरफेर अजूनही नाही बुद्धीला गठली..

  काय केले मग इतके वर्ष शाळा-कॉलेजला जाऊन..
  करा तर उजळणी एकदा भूतकाळात डोकावून..

  शिक्षण संस्थेला बोलून कित्येकांनी बदडले..
  सांगा तर, स्वतःचे भविष्य कोणी व कितींनी बदलले..?

  प्रत्येक गोष्टीची उजळणी रट्टूपोपट सारखी केली..
  कसा कळेल मग नेमकेपणा व मूळ शिक्षणशैली..?

  शिकण्याचा उद्देश कधी कोणीच नीट समजावले नाही..
  आणि विद्यार्थ्याकळून सतत अपेक्षा शिक्षक व पालक करत राही..

  फक्त केला त्यांनी विचार की शिक्षणात मुल मागे राहत..
  पण केला का हा विचार की त्याचं कारण काय असू शकत..?

  मुलं नाही कधी अपेक्षा करत शिक्षक व पालकांकडून की त्यांनीही त्यांच्या क्षेत्रात अव्वल असावं..
  मग मुलांबद्दल का त्यांच्या मनी हे इतकं ठासून बसावं..

  तरी, नक्की चूक शोधताना विचार करावा लागेल मानसिकता बदलून..
  आजचे व भविष्यातले पालक मंडळींनो पुनःश्च विचार करा व पहा तपासून..

  ©patilmrunali

 • patilmrunali 84w

  Pehle kya kam udas hai man
  Jo tum ab todne pe utar aaye  ©patilmrunali

 • patilmrunali 85w

  पाऊस सरल्यावर

  काळेकुट्ट मेघ गायब झाले
  निलगगन ते आकाशी आले
  अंगणी जलमय डबके साचले
  पक्षी चिवचिव करू पाहले
  गाई म्हशी पुन्हा फिरू लागले
  धरतीवरी सर्व न्हाऊन निघाले
  थंडगार वारे चेहऱ्यावरून वाहले
  वातावरण तृप्त तृप्त जाहले
  पाऊस सरल्यावर जे जाणिले
  असे दृश्य मज इथे गवसले


  ©patilmrunali

 • patilmrunali 85w

  हरपल देता है दुसरोंके कर्मो को दोष
  नहीं करता स्वयं के अंतरंग की खोज
  क्या हम सब में ऐसा गुण है? या कहे दुर्गुण..
  पढीये, देखीये, सोचिये और बताइये..��

  Read More

  अंतरंग

  तांता लगाये रखे दुसरों की निंदा का सदा
  स्वयं के बारे में केवल स्तुती की अभिलाषा

  मांगता रहे भगवान से आशिष स्वयंहेतू
  दुसरों की मनशाओ को कम समझे किंतु

  स्वयं के हर शब्द को चाहे अच्छासा मोल
  दुसरोंसे कहे हमेशा उपहास के बोल

  स्वयं के सिध्दांतों पर खूब है इठलाता
  दुसरों की हर परिभाषा गलत ठहराता

  अंतः जब कोई उसे आईना दिखलाये
  क्रोधाग्नी उसके अंतर में समा जाये

  ©patilmrunali

 • patilmrunali 85w

  जिंदगी के दौड में हम सोचते रहते है
  मुकाम हासिल होगा कब
  जिंदगी तो ठहरसी जायेंगी
  अलविदा कहना पढेगा तब

  इस पल में, आज में
  जिले जरा चल
  किसने देखा है
  जिंदगी का आनेवाला कल

  ©patilmrunali

 • patilmrunali 85w

  जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने��

  Read More

  एक उजळणी

  उन्हाळा येऊन गेला आला आता पावसाळा
  यंदा कोरोनामुळे कसलाच पत्ता नाही लागला

  ना कळलं विदर्भातलं तापमान ना कळली मराठवाड्याची पाणीटंचाई
  टाळेबंदीमुळे वैतागला माणूस सतत करी घरातून निघायची घाई

  ५० वर पोहचला होता यावेळी सूर्याचा ताप
  पण ऐकण्यात होत की ओझोन छिद्राची आर्क्टिक वर झालीये थोडी कपात

  चक्रीवादळांचा वेग तर अबब करणाराच होता
  भले निसर्ग देवतेचे जो स्व नियंत्रित होता

  निसर्गावर कोणी कधी जिंकू शकलं नाही ना जिंकू शकणार
  जिंकेल तोच जो प्रकृती सोबत प्रगती हा नियम साधणार

  ©patilmrunali