hrishikarekar

Engineer by profession. Art lover by heart

Grid View
List View
 • hrishikarekar 101w

  स्वप्न..

  डोळ्यातलं स्वप्न
  नदीसारखं वाहणारं..
  इवल्याश्या पापण्यांतून
  आकाशात झेपावणारं..

  डोळ्यातलं स्वप्न
  पावसासारखं बरसणारं..
  ओंजळीत धरु पाहता
  अलगदपणे निसटणारं..

  डोळ्यातलं स्वप्न
  समुद्रासारखं फेसाळणारं..
  उधाणलेल्या भरतीनंतर
  ओहोटीत मिसळणारं..

  डोळ्यातलं स्वप्न
  घारीसारखं उडणारं..
  उंच उंच झेपावताना
  जमिनीवर खिळणारं..

  डोळ्यातलं स्वप्न
  बाळासारखं बागडणारं..
  गोबऱ्याशा गालांमधून
  खट्याळपणे हसणारं..

  डोळ्यातलं स्वप्न
  सुर्यासारखं उगवणारं..
  मावळतीच्या वेळेलाही
  आसमंत सजवणारं..
  ©hrishikarekar

 • hrishikarekar 105w

  ©hrishikarekar

 • hrishikarekar 105w

  मनातली जागा..

  कितीही इच्छा असली तरी आपण एखाद्याच्या आयुष्यात त्याच्या मनाविरुद्ध जागा मिळवण्याचा प्रयत्न करू नये तसेच स्वतःच्या आयुष्यातील जागा एखाद्या व्यक्तीच्या मनाविरुद्ध त्याच्या हवाली करू नये, कारण अनेक वेळा त्या व्यक्तीला त्याची किंमतच उमजत नाही, मग पाश्चात्तापाने आपलं मन आणि मनातली ती जागा डळमळीत होते आणि भविष्यात आपण ती व्यक्ती सुद्धा नाकारतो ज्याची खरंच त्या जागी आरूढ होण्याची योग्यता आहे.
  ©hrishikarekar

 • hrishikarekar 112w

  रिपरिप

 • hrishikarekar 117w

  केवळ कुठल्यातरी एका दिवसासाठी आई-वडिलांसोबतचा आपला फोटो स्टेटस वर ठेवण्यापेक्षा दररोज त्यांना योग्य तो मानसन्मान देऊन त्यांच्या नजरेतलं आपलं ‛स्टेटस’ अभिमानाने कसं उंचावेल? यासाठी प्रयत्न करणं केंव्हाही चांगलं नाही का ?
  ©hrishikarekar

 • hrishikarekar 119w

  क्रिकेट च्या देवाचा काल वाढदिवस होता. त्या निमित्ताने देवावर केलेली कविता ��

  Read More

  लखलखता तारा

  ©hrishikarekar

 • hrishikarekar 120w

  कवी- अर्थात मीच
  सुलेखन- श्री. नरेंद्र पांडुरंग चापळे
  ©hrishikarekar

 • hrishikarekar 122w

  हे हनुमंता..

  तुझ्या ठायी असणाऱ्या स्वामिनिष्ठेची, निरोगी शरीराची आणि बळकट मनाची आज आम्हाला खऱ्या अर्थाने गरज आहे. या कोरोनारूपी वैश्विक महामारीचे जे संकट देशासमोर आ वासून उभे आहे, त्याला तोंड देण्याचे सामर्थ्य आज आम्हाला दे आणि भविष्यात घडणाऱ्या बऱ्यावाईट प्रसंगांमध्ये विचलित न होता ठाम राहण्याचे वरदान आम्हाला दे. #thoughts

  Read More

  जय बजरंगबली..

  ©hrishikarekar

 • hrishikarekar 130w

  गुलाब

  कधी गुलाबाच्या काट्याच्या अंतरंगात डोकावण्याचा प्रयत्न केलात? का मश्गुल होता फक्त त्या गुलाबाच्या रूपावर, नाजूकपणावर आणि सुगंधावर? कधी त्या काट्याने धारण केलेल्या अणकुचीदार स्वभावामागे नेमकी काय कारणं असतील याचा विचार केलात?

  विचार केलात तर समजेल की गुलाबाच्या पाकळ्यांना मुभा असते आपल्या नाजूकपणात आणि सुगंधात मनसोक्त बागडण्याची ती फक्त आणि फक्त त्या काट्यामूळेच. त्या काट्याच्या बोचऱ्या स्वभावामुळेच तोरा मिरवता येतो गुलाबाला. कारण नाजूकपणाचे, सौंदर्याचे आणि सुगंधाचे ही वैरी असतात या जगात. पाकळ्यांची ती सुरेख मांडणी आपल्या स्वयंभू सुवासासकट कोणी कुस्करण्याचा प्रयत्न केलाच तरी तिथपर्यंत पोहोचण्यासाठी अडथळा म्हणून त्याच्या वाटेत असतो हाच तीक्ष्ण काटा.

  ‛‛म्हणून गुलाबाने स्वतःच्या सौंदर्यावर, रूपावर आणि सुवासावर अभिमान जरूर बाळगावा पण त्याला किंमत आहे ती फक्त या बेढब, कुरूप आणि बोचऱ्या काट्यामुळेच हे विसरू नये..’’
  ©hrishikarekar

 • hrishikarekar 136w

  Airplane mode.

  मनाला सुद्धा ठराविक काळासाठी Airplane Mode वर टाकता आलं असतं तर ? ना कुठली भावना मनात आली असती आणि ना तिचा खून होताना मनाला त्रास झाला असता.
  ©hrishikarekar