#swapn

7 posts
 • mr_abhishabd 137w

  स्वप्न बनून..

  मनात माझिया तुझी याद रहावी
  आठवली की आठवत जावी
  स्वप्नात सदा तूच रहावी
  आणि स्वप्न बनून निघून जावी..

  येताना निखळ हसू बनून यावी
  हसली की हसवत जावी
  स्वप्नात सदा तूच राहवी
  आणि स्वप्न बनून निघून जावी..

  पहाटेची किरण कवडस्यातून यावी
  मज पहावी अन लाजून जावी
  स्वप्नात सदा तूच रहावी
  आणि स्वप्न बनून निघून जावी..

  मला जपायला देवाशी भांडावी
  हरणार म्हणून कधी न दिसावी
  शेवटी स्वप्नात सदा तूच रहावी
  आणि स्वप्न बनून निघून जावी..

  अभिशब्द..
  ©abhishabd

 • sagar_09 149w

  सत्य का स्वप्न ?

  पाहता तिला भान माझे ते गेले
  सत्य का स्वप्न मज काहीच न उमजले !

  गुलाबी तिच्या ओठांनी गुलाबाला देखील लाजावले
  मधाळ तिच्या हसण्याने मला पुरतेच फसवले !

  मृगनयनी डोळ्यांत तिच्या मला अडकवले
  नकळतच मज मुखातून शब्द निघू लागले !

  गालावरील खळी ने ह्रदयाला माझ्या हेरले
  एका नजरेनच तिच्या मला घायाळ केले !

  पहिल्या भेटीतच मला आपलेसे तिने केले
  पाहता तिला हे जगच जागी थांबले !

  नकळतच सारे घडून असे ते गेले
  सत्य का स्वप्न मज काहीच न उमजले !
  ©sagar_09

  #sgr09 #marathi #swapn #satya #imagination #real
  #love #prem
  @mindlines_225 @dhanashreparab16 @gazal_e_vishal @odysseus @vibhawarijadhao
  @sharmee_m @avyakt @samikshabhusari @aaditishinde @affectionately_apoorva

  Read More

  ।। सत्य की स्वप्न ।।
  ( मथळा पाहा )
  ( सागर रणपिसे )

  ©sagar_09

 • sagar_09 163w

  अक्षरे बागडली मने रमली
  सुवाच्य सुंदर बाराखडी बनली ।।१।।

  निर्मळता आली सौख्य घेऊनी
  घृणता गेली दूर पळूनी ।।२।।

  स्वच्छ सुंदर पर्यावरण झाले
  नागरिक देखील सुजाण झाले ।।३।।

  माणुसकीचे विणले आता धागे
  प्रेमाने जपले हो ते नाते ।।४।।

  प्रेमच प्रेम वाहू लागले
  सर्वांना जवळ आणू लागले ।।५।।

  इथे ना कोणी आरक्षित राहिले
  इथे सर्वच आता सुशिक्षित झाले ।।६।।

  वादाची जागा सुसंवादाने घेतली
  भांडणांची जागा बंधुभावाने घेतली ।।७।।

  गुन्हेगारी ती संपुष्टात आली
  समाजात आता एकजीवता आली ।।८।।

  अचानक कसला आवाज झाला
  सत्याचा मला वास आला ।।९।।

  एकदम माझी झोप उडाली
  वास्तविकतेची प्रचिती मला झाली ।।१०।।

  स्वप्न होते ते मज कळाले
  मन माझे पुन्हा ते दुखावले ।।११।।

  तरीही ते स्वप्नातच अडकून बसले होते
  वास्तविकतेला जणू दूर लोटू पाहत होते ।।१२।।
  ©sagar_09

  @odysseus @mindlines_225 @writing_eagle_ @dhananjaylatpate123 @piyawrites @diya_lucky
  @main_vishal_or_meri_qalam @vibhawarijadhao @avyakt @samikshabhusari
  #sgr09 #4ank #osr #iambugs #swapn #dream #marathi #hashj #dishu #shej

  Read More

  || स्वप्न ||

  अचानक कसला आवाज झाला
  सत्याचा मला वास आला ।।
  ( मथळा पाहा )
  ( सागर रणपिसे )
  ©sagar_09

 • hukumatsingh 233w

  स्वप्नांच्या जगावर माझाच तर हक्क आहे,
  तुला तिथे पाहण्याचा तो वेगळा बहाणा आहे...

  खुशाल येईन रे वेड्या तुझ्या स्वप्नात..
  पण त्या अधी तू प्रवेश तर कर;
  स्वप्नांच्या जगात..

 • sonofchaudhary 239w

  ●स्वप्न●

  उस रात में भी कुछ बात थी
  ठंडी सिरन हवाओ में
  चीरती एक भाप सी
  देखते ही गुम होने की
  अजीब चंचल मिजाज सी
  एक छोर वो खड़ी
  सूंदर मूरत प्यार की
  मन में जल उठी
  उसे पाने की आस सी
  कूद गए उस दरिया में
  मन में डूबने की लाग थी
  छोर पहुचे ही थे की
  एक लहर सी आन पड़ी
  बहा के हमे ले गयी
  दूर शीतलता के बाहर ही
  स्वप्न के आगोश से
  जब खुली हमारी आँख थी
  आ गए उसी हैरत में
  जहाँ से शुरुआत की।

 • aanjney_bhardwaj 245w

  वो और मै कभी एक तो नहीं थे, पर फिर भी वो मेरी तमन्ना थी और मै उसका स्वप्न गहरा

  ©aanjney_bhardwaj

 • pooja_butola 255w

  ये प्यारा सा गगन, तारों से भरा चमन,
  ये चंदा की चंचल किरण, रात में बहती ठण्डी पवन,
  ये स्वप्न से भरे नयन, ये खुला सदन,
  ये रात का शांत वातावरण, खुशियों से भरा उपवन
  ये दृश्य है बड़ा ही मनभावन।
  #hks #swapn @hindikavyasangam #gagan #chaman #pawan #nayan #upwan #rat #vatavaran #manbhawan #hindilekh #wru #writersnetwork #mirakee #IG @butola_pooja #beauty_of_night

  Read More

  ये प्यारा सा गगन, तारों से भरा चमन,
  ये चंदा की चंचल किरण, रात में बहती ठण्डी पवन,
  ये स्वप्न से भरे नयन, ये खुला सदन,
  ये रात का शांत वातावरण, ख़ुशियों से भरा उपवन,
  ये दृश्य है बड़ा ही मनभावन।


  © पूजा बुटोला