#poetic_mrunali

9 posts
 • patilmrunali 86w

  पुनः पुन्हा स्वप्नांत ज्याच्या जगत असतं मन
  त्या गोड कथेचं नाव “बालपण"
  #childhood #memorabledaysoflife #lovethosedays #poetic_mrunali

  Read More

  बालपण

  …मैदानी खेळ
  मित्रांचे मेळ…
  …कट्टी नंतर बट्टी
  अन् ती शाळेची सुट्टी…
  …बापरे! त्या दप्तराचं ओझं
  ती उन्हाळ्याच्या सुट्टीतली मौज…
  …रंगलेला गिल्ली-दांडुचा खेळ
  ठेल्यावरची पाणीपुरी व ती चटकदार भेळ…
  …गोल-चपट्या poppins त्या रंगेबिरंगी
  अन् गोडगोड icecream ची कांडी…
  …गुलाबी तो बुड्डी का बाल
  थंडगार pepsi ची कायच कमाल…
  …हरवलेलं ते मामाच पत्र
  मैत्रिणींच्या सोबत काकणं आणि टिकरं…
  …जमायची ती चौकष्टाची मांडणी
  छोटी-छोटी भातुकली मधली भांडी…
  …कधी असायची तान्हा पोळ्याची स्वारी
  तर कधी भुलाबाईची गाणी…
  …पिचकाऱ्यांनी रंगांची उधळण
  ती दिवाळीतल्या फटाक्यांची दणादण…
  …अहो, हे तर लिहता-लिहता सरत नाहीये
  आठवत बरंच काहीये…
  …तुम्हीही आठवा तुमच्या खट्याळ बालपणाला
  आणि comment करा एखाद्या आठवणीला…

  ©patilmrunali

 • patilmrunali 86w

  #past

  ★“No one can change his PAST."★


  What's in my hands right now is
  TODAY
  I can't change my yesterday.
  I can't design my tomorrow.
  But I can design my today
  and so I can change my today.
  This might be minimize pain of my yesterday and bring a good tomorrow for me as well as fr my near-ones.

  ©patilmrunali

 • patilmrunali 86w

  माना कुदरत में “बदले" जैसा कुछ है
  फिर भी “माफी" सबसे उपर क्यू है?
  क्यूँ की बदले की “आग" होती है
  और माफी “बेदाग" होती है
  आग हमे “जलाती” है
  और बेदाग जिंदगी “खुशनुमा" बनाती है
  खुशी का “हरकोई" हकदार होता है
  और “हक" बदले में नहीं,
  “प्यार" में होता है।

  ©patilmrunali

 • patilmrunali 87w

  लम्हा वो बिता हुआ साथ तेरे।
  याद तो आया मगर गम दे गया।।
  झुटी हंसी दिखायी जो मैंने।
  आयना भी मुझे देख बेजार हो गया।।
  साथ था तो हमेशा तेरा साया।
  फिरभी मैंने खुद को तनहा ही पाया।।
  बिखरे नहीं मगर मेरे जिंदगी के धागे।
  मैं अकेलीही काफी हूं पुरी दुनिया के आगे।।

  ©patilmrunali

 • patilmrunali 87w

  प्रेम

  प्रेमात आठवते गाणे
  वाटे सतत गुनगुनायचे,
  सुंदर सुंदर क्षण त्यातले
  स्वप्नात नकळत रंगवायचे.

  अबोल मनात कुठूनी येतो
  तो प्रेमाचा स्पर्श नवा?
  त्या स्पर्शाने विणत-जोडत
  उत्साह येतो जीवनात जो हवा.

  प्रेमाच्या त्या फुलझाडावर
  एक फुल सुगंधी फुलते,
  चेहऱ्यावरचे तेज तुझे पाहुनी
  मन माझेही खुलते.

  हर्ष होतो द्विगुणित कसा
  विचार मज हा पडते,
  मग आठवते प्रेम तुझे ते
  ज्याने विसरुनी सारे मी जाते.
  ©patilmrunali

 • patilmrunali 87w

  जुदाई

  आँखोमे नमी..
  होठो पे हंसी..
  दिल में दर्द..
  और
  जुबान पे प्यार...

  क्या यही होता है
  जुदाई का नाम....?

  ©patilmrunali

 • patilmrunali 87w

  मनाचे बळकटीकरण

  आयुष्यच्या वादळात स्थेर्य नेहमी कायम ठेव..
  कधी वाटली भीती तरी स्वतःला शांत ठेव..
  प्रगती पथावर चालताना धोंडे येतील रे खूप वाटेत..
  डोंगरावरून घसरला पाय तर धैर्य नेहमी सोबतीला ठेव..
  माझं-तुझं करणारी मांडणीच आहे जगाची..
  स्वतःची मात्र ओळख वेगळी कायम ठेव..

  ©patilmrunali

 • patilmrunali 87w

  मैत्री

  तू मला नि मी तुला सारं काही सांगावं,
  अस नातं या मैत्रीत असावं..

  रुसवा - फुगीही असावी,
  खट्याळ मस्तीही दिसावी..

  गोडवा त्यातला संपता संपायला नको,
  भांडण अन वाद तात्पुरतेच असो..

  "तू तिथे मी" चा concept गरजेचा नसावं,
  मनात हे नातं सर्वात वर असावं..

  आयुष्यात नेहमीसाठी साथ सोबत नसेल,
  पण माघारी पाहताना त्या मैत्रीचा हाथ नेहमी पुढे दिसेल..

  ©patilmrunali

 • patilmrunali 87w

  घालमेलीचा अंत...

  शांत होते मी सकाळपासून
  काहीतरी घालमेल होती मनात ठसून
  ऋतुचक्रात न विसावता
  बसले होते एकट्यात बसून

  वाटत होते कुणीतरी यावे
  गोंजारावे मला वासरा समान
  खळखळत्या त्या सूर्याच्या लाटांत
  विरघळून जावे मी बर्फासमान

  दिवसभरातली घालेमल
  कातरवेळीही सरली नाही
  सापडताही उत्तर प्रश्नाचे सापडेना
  मन विचारांत अजूनच गुंतत राही

  घ्यावा सुटकेचा श्वास तसा एक वाक्य
  गुंतलेलं चित्त सोडवून गेला
  बरे वाटले मनाला आणि
  घालमेलीचा अंत झाला

  हास्य उमटले गालावरती
  टिपले काही शब्द मनातून
  कागदावर उभारुन त्यांना
  प्रस्तुत केले माझ्या लेखनीतून

  ©patilmrunali