#memorabledaysoflife

1 posts
 • patilmrunali 86w

  पुनः पुन्हा स्वप्नांत ज्याच्या जगत असतं मन
  त्या गोड कथेचं नाव “बालपण"
  #childhood #memorabledaysoflife #lovethosedays #poetic_mrunali

  Read More

  बालपण

  …मैदानी खेळ
  मित्रांचे मेळ…
  …कट्टी नंतर बट्टी
  अन् ती शाळेची सुट्टी…
  …बापरे! त्या दप्तराचं ओझं
  ती उन्हाळ्याच्या सुट्टीतली मौज…
  …रंगलेला गिल्ली-दांडुचा खेळ
  ठेल्यावरची पाणीपुरी व ती चटकदार भेळ…
  …गोल-चपट्या poppins त्या रंगेबिरंगी
  अन् गोडगोड icecream ची कांडी…
  …गुलाबी तो बुड्डी का बाल
  थंडगार pepsi ची कायच कमाल…
  …हरवलेलं ते मामाच पत्र
  मैत्रिणींच्या सोबत काकणं आणि टिकरं…
  …जमायची ती चौकष्टाची मांडणी
  छोटी-छोटी भातुकली मधली भांडी…
  …कधी असायची तान्हा पोळ्याची स्वारी
  तर कधी भुलाबाईची गाणी…
  …पिचकाऱ्यांनी रंगांची उधळण
  ती दिवाळीतल्या फटाक्यांची दणादण…
  …अहो, हे तर लिहता-लिहता सरत नाहीये
  आठवत बरंच काहीये…
  …तुम्हीही आठवा तुमच्या खट्याळ बालपणाला
  आणि comment करा एखाद्या आठवणीला…

  ©patilmrunali