#marathiwriters

99 posts
 • smartsam 10w

  नवी सकाळ!

  नवी कोमल सकाळ!
  थंडगार दवशिर पहाट!!
  सर्व कसे शांत संथ
  मन ही उबदार वाहत!

  हवेचा थंड स्पर्श
  मनोमनी शांत हर्ष!
  निळसर अनंत नभ
  हवेत जणू
  प्रेमाचा अलगद स्पर्श!

  हळुवार सरली निशा
  अलगद ओसरले तारे!
  नवीन पान उघडले पहा
  जीवनाच्या पुस्तकाचे!

  श्वास अनमोल शांत
  खोल मनाची झेप!
  रचला ना काही अद्याप
  आराखडा दिसाचा नवीन सुरेख!

  शांत परिसर पहा मोकळे,
  कोरडे रसते अन्
  शीतल प्रफुल्ल फुलपण!
  टपोर अंकुर, कोंभ
  आणी सपाट सारे मैदान!

  जशी रान पाखराची झेप सुरेख
  दिवस आजचा छान!
  कोर करकरीत शुभ्र जस
  जीवनाच्या वहीच नवीन पान!

  ©SmartSam

 • dnswords 10w

  नंतर मध्ये अंतर असतं  ©dnswords

 • smartsam 21w

  #marathi_shabd @mirakee_marathi
  #marathiwriters
  @marathiwriters
  @mirakee_marathi
  @mirakee
  @मराठी #काव्य #मराठी_कविता @कविता #कविता

  Read More

  अनावर दुःख!

  काळ निघून गेला
  आशा तश्याच उरल्या!
  खंत अतृप्त मनातल्या
  नाही मात्र सरल्या!

  आशा मनाच्या अजुन
  दुःखी करून गेल्या!
  निराशा लाज हाती
  दुःख भरून आल्या!

  काळ ओसरला
  वर्ष अनेक पलटले!
  अंतकरणी होते जे
  ओझे ना ते सरले!

  जीवाची तृष्णा
  जीवातच राहिली!
  अवघी राहिली अतृप्त
  स्वप्न जी मी पहिली!

  ©SmartSam

 • smartsam 25w

  गावरान मिरची!
  ��️��️��️

  लवंगी मिरची असो की ढब्बू
  मिरची तर पाहिजेच!
  ठेचा की लोणच
  टीचकन तर चव लागतेच!

  कधी खमंग तर कधी घ्या तर्री
  लाल, लाल कधी रस्सा सर्री!
  तिखट, तांबड कालवण
  आह! मटण रसयाची फुर्री!

  कोल्हापुरी रस्सा करी सर्रास,
  घ्या कोकणची आमटी!
  गावरान मिरची बटुक
  कोणा लागते जास्त
  कोणास तिखट भर चिमटी!

  असा खमंग सुवास दादा
  स्वयंपाक घरात!
  कधी यावं राव
  मांडीला मांडी पंगत,
  भाकर, कांदा, लोणच
  मटण मिरची जेवण झक्कास!

  सगळंच गोड तर काय
  जेवणाची मज्जा?
  झणझणीत जरा भावा
  घ्यावा तिखट गावरान रस्सा!

  झुरझुरनारी मिरची हिरवी
  की लाल मिरची लसणाचा ठेचा!
  याव राव सोबत आमच्या बी
  कधी जेवायला बसा!

  ©SmartSam

  @marathi_shabd #marathi #marathiwriters
  #marathiquotes
  @marathiwriters
  #mirakee_marathi
  @mirakee_marathi
  @mirakee #mirakee @mirakee

  Read More

  .

  .

 • smartsam 26w

  पहिला पाऊस!

  ️️️

  आला पहिला पाऊस!
  आला पहिला पाऊस!!
  शहरातल्या लोकांना रे
  नाही तुझी हाऊस!

  अरे पाऊसा झिरझिर रात्रीच पड
  दिवसा नको येऊस!
  शहरातल्या लोकांना रे
  नाही तुझी हाऊस!

  आला पहिला पाऊस!
  आला पहिला पाऊस!!

  छत्री ही आता नवीन आना
  तापट हा वारा मोडी तिचा कन्हा!
  दुरुस्तीला पुन्हा टपरी वर न्हया ना!
  आजकाल खरच
  नाही पाऊसात काही मौज!
  शहरातल्या लोकांना रे
  नाही तुझी हाऊस!

  लोकल झाल्या बंद, वीज झपकन उडे,
  लेकर ताप अन् आजारी,
  खर्च वाढे सरासरी!
  अरे पाऊसा असा त्रास नको देऊस!
  शहरातल्या लोकांना रे
  नाही तुझी हाऊस!

  यायचं तर रात्री ये
  दिवसा नको येऊस!
  शहरातल्या लोकांना रे
  नाही तुझी हाऊस!

  आला पहिला पाऊस!
  आला पहिला पाऊस!!

  ️️️

  ©SmartSam

 • smartsam 29w

  धुक!

  जिकडे तिकडे पडलय
  नुसत धुक!
  जीवन झालंय जणू
  नुसत फिक फिक्!

  जीवनात एके काळी
  होता लख्ख प्रकाश!
  आता मात्र वाटत
  नाही काही खास!

  आशा झिरल्या जणू
  पत्र्यावरच टीप टीप पाणी!
  चालले घरी लोक दूर
  आपल्या अनवाणी!

  लहानपण माझ गोड
  भरगच्च आशा, स्वप्न आणि सुख!
  जीवन आता मात्र
  फुसकटलेल धुक!

  ©SmartSam

  #mirakee #मराठी @मराठी_काव्य @मराठी #कविता @कविता @धुक @कविता_मराठी #मराठी_काव्य
  #marathiwriters
  #marathiquoteso
  #marathiwriters
  @marathiwriters
  #marathiquotes
  @marathiwriters

  Read More

  .

 • dnswords 31w

  1मे

  दिन कैसा भी हो

  उसे बनाना पडता हैं.....!

  ऐसा ही दिन छत्रपती जिने बनाया अपनो के लिये!

  जय महाराष्ट्र


  ©dnswords

 • smartsam 36w

  हरवलेला माणूस!

  किती छान दिवस होते
  प्रेम होत किती बघा!
  दिवस असो की रात्र
  गोड आठवणी तेव्हा!

  एकत्र बसून गप्पा, गोष्टी
  आपुलकी, प्रेम अन् होत
  दया भाव किती!
  माणूसकी लोकांत होती
  माणसात होती निती!

  तंत्रज्ञान जरी इतकं न्हवत
  लोका लोकात दादा, ताई होत!
  अन् भावा भावात
  प्रेम खूप होत!

  सगळ असूनही आज लोक
  प्रेम, मायेची भुकेली!
  धाक, भीती, भ्याव ह्यातच
  लोक आज सारी पांगली!

  एकत्र येणं अन्
  सोबत उठण बसणं होत!
  आता काय म्हणे तर
  नुसत हसन खोटं फोटो असत!

  जीवाला जीव,
  खांद्याला खांदा होता!
  लोकात होत प्रेम
  माणुसकीत माणूस होता!

  आता सगळ झालंय जबर
  पण मायेची नाही खबर!
  सुखच नाही लोकांत
  पैसा, धन अमाप
  असेना का ढीगभर!

  सगळी काम करतेय मशीन
  काहीही यंत्रणास सांगेणा!
  माणूसकी मात्र हरवलिये
  खर प्रेम, माणूस खरा
  मात्र कुठ घावे ना!

  ©SmartSam

  #mirakee @mirakee
  @live_forever_young
  #poem
  #pod
  @writersnetwork
  #writersnetwork
  #writingcontest
  #creativearena
  @marathi #marathi
  #marathiwriters
  #marathiquoteso
  #marathiwriters
  @marathiwriters
  #marathiquotes
  @marathiwriters

  Read More

  .

  ©smartsam

 • smartsam 42w

  निकीता!

  आंब्याला जणू
  लागलाय मोहर!
  असाच सुंदर "निकु" तुझ्या
  ज्वाणीचा बहर!

  केस काळे लांब
  गोरा गोरा चेहरा!
  त्यात गजरा मोगऱ्याचा
  तुझ्या केसात साजरा!

  तूच माझं प्रेम
  तूच माझी कविता
  तूच माझी राणी
  तूच माझी निकीता!

  ©SmartSam

 • smartsam 42w

  यहोवाची किमया!

  नाजूक तुझा बांधा
  कोरीव तुझी काया!
  अदभुत सृष्टी अशी
  मोहक अती प्रिया!

  कंबर किती नाजूक
  हर कटाक्ष बघते लाजून!
  अंबरापरी सुंदर
  राहतेस प्रिये उभी
  पदर जेंव्हा घेऊन!

  नयन किती प्रांजळ
  स्मित फुलापरी अनमोल!
  अनंत आभार देवाचे
  किती अनमोल असीम
  यहोवा देवा तुझी किमया!

  ©SmartSam

 • smartsam 43w

  प्रिये

  एक चित्र सुंदर पाहिलं
  मन जडून त्यावर राहील!
  वेळ काढूनच जणू यहोवा देवाने
  हे प्रात्यक्ष सुंदर कोरल!

  डोळे मोठे काळेभोर
  गाल मऊ उबदार!
  गोडगुलाबी खांद्यावर
  मखमल केसांची झालर!

  दिवस नवा जो आला
  अंधार निषेचा गेला!
  मन मनातच हर्षले माझे
  चेहरा सुंदर तुझा जो पाहिला!

  तुझी स्मृती मनात राहिली
  क्षणापासून ज्या तुला मी पाहिले!
  हे काव्य मधूप्रिये
  तुझ्याच साठी मी वाहिले!

  हे काव्य मधूप्रिये
  तुझ्याच साठी मी वाहिले!
  एक चित्र सुंदर पाहिलं
  मन जडून त्यावर राहील!

  एक चित्र सुंदर पाहिलं
  मन जडून त्यावर राहील!

  ©SmartSam

 • smartsam 44w

  सुखी रहा !

  लक्षात ठेवा नेहमी
  आपले भावनिक स्वातंत्र्य!
  नम्रपणा जीवनात आणी
  गरीब ही मित्र!

  विसरू नका कधी
  आपली वायत्तिक जबाबदारी!
  तसच सकाळचा चहा,
  नाष्टा आणी न्याहरी!

  भेटा त्यांना
  जे असतील गरजवंत!
  सगळ्यांवर करा प्रेम नाही फक्त
  सुंदर आणी श्रीमंत!

  लक्षात असो नेहमी
  आपल्या जीवनाचा उद्देश!
  कार्य करा मेहनतीने
  होऊ दे तुमचे लक्ष सिध्दीस !

  जाण ठेवा आपली
  माणूस असण्याची!
  एखाद्याला जमेल ती
  मदत करण्याची!

  नम्र, प्रेमळ आणी प्रेम भाव ठेवा!
  आनंदी, समाधानी आणी स्वस्थ रहा!
  उद्याचे तथ्य आजच डोळ्यात पहा.
  जीवनात असो उद्देश नी आनंद
  सदा सुखी रहा !

  ©SmartSam

 • smartsam 44w

  अंजली!

  बाजूला माझ्या उभी
  जी तू राहीलीस!
  साजली अंगावर माझ्या जणू
  तुझ्या केसांची सावली!

  सार शहर फिरलो
  एकच मला पावली!
  तुझ्या सारखी साजरी
  एकच तू अंजली!

  अबोल तुझे डोळे
  गोड गोफेल चेहरा!
  हळुवार समीप तुझ येणं
  पण आता माझ्यावर ही पेहरा!

  नाजूक तुझा बांधा अन्
  मनात लपलेली भावना!
  पाहिल्या विना तुला
  आता अंजु मला राहवेना!

  अमावस्या च्या ही राती
  उगवला जणू चंद्र!
  अलगद तुझी पावलं अंजु
  करी मला मंत्रमुग्ध!

  तुझ्यात माझ्यात अंजु
  आता अंतर नको हे!
  अलगद लाजात समीप
  राणी जवळ माझ्या तू ये!

  उमलली एक नाजूक कळी
  एव्हाना फुल नाही फुलले!
  आठवणीत अनंत
  अंजु माझी अंजली
  अबोल तुझ प्रेम
  अनंत दडून राहिले!

  अंजु!


  ©SmartSam

 • smartsam 47w

  माझ गाव!

  अलगद झुलणारी फुल
  आठवणींचा ठेवा!
  एकदा तरी पाहुंण आमच्या
  गावाला यावं!

  निळनिळ आकाश
  सूर्य किरणांचा प्रकाश!
  अजुन ही आहे बऱ्याच
  लोकांत विश्वास!

  गुलमोहराचा वाफा दादा
  न्याहळून तर पहावं!
  एकदा तरी पाहुंण आमच्या
  गावाला यावं!

  झुकलेली नारळाची झाड
  संथ वाहे शुद्ध हवा!
  जिकडे तिकडे
  हरवगार रान तुम्ही पहा!

  आमरस गोड गोड जणू प्रेमाचा घास
  गाव सर फिरू, आनंदान पाटावर पोहाव!
  एकदा तरी पाहुंण आमच्या
  गावाला यावं!

  सुशिक्षित लोक, हसत खेळत लेकर
  गाई, म्हशी, कोंबड्या, बकऱ्या अन् मेंढर!
  हिरवगार रान, बघा फुलांचा बहर
  शहरा वाणी नाही दादा
  मनभरून आमच्या कडे राहावं!
  एकदा तरी पाहुंण आमच्या
  गावाला यावं!

  पाटावर जाऊ, ऊस वाटेत तोडून खाऊ.
  मोर ही आहेत रानात, झुंड पारव्यांचा पाहू!
  माझं गाव खूप सुंदर,
  जिकडे तिकडे प्रेमाचा साजार!
  गवतावर झिरपत मोत्या सारख दवं
  एकदा तरी पाहुंण आमच्या
  गावाला यावं!

  सुखात नांदती सूना
  नंदा, जावत नाही काही उना!
  घराघरात माया
  प्रेम भावाभावतल पहावं
  एकदा तरी पाहुंण आमच्या
  गावाला यावं!

  लोक आहेत साधी
  पण प्रेम आहे खूप!
  नाही मिळणार दादा
  कोंडलेल्या शहरात अस सुख!
  निसर्गाच्या सानिध्यात मिसळून तर पहावं!
  एकदा तरी पाहुंण आमच्या
  गावाला यावं!

  जास्त नाही मोठ
  आहे तस छोट!
  रातराणात अलगद काजव्यांचा प्रकाश
  पहाटे पहाटे ऐकावी
  किलबिल पाखरांची गोड!
  एकदा तरी पाहुंण आमच्या
  गावाला यावं!

  नाही काही प्रदूषण
  नाही गर्दी कोंडीच दडपण!
  घरी अंगण सरपण
  घरा समोर पटांगण.
  प्याव गोड पाणी
  थंड भरलया रांजण!
  एकदा तरी पाहुंण आमच्या
  गावाला यावं!

  फेटा, लुगड, खमिज
  आहे जुनी ठेव!
  चावडी, बाझार, हिरवं रान!
  हिरवगार वावर, चुलत्या सारवती अंगण, वहिनी मोडती सरपर्ण.
  सर्वीकडे प्रेम, आनंद पहावं!
  एकदा तरी पाहुंण आमच्या
  गावाला यावं!

  खूप आहे सुंदर माझं गावं
  एकदा तरी पाहुण आमच्या
  गावाला यावं!
  करू सगळी सोय
  तुम्ही हो तर म्हणावं!

  एकदा तरी पाहुंण आमच्या
  गावाला यावं!
  एकदा तरी पाहुंण आमच्या
  गावाला यावं!

  ©SmartSam

 • smartsam 48w

  नात!

  शब्दांनी तुटत मन
  शब्दांनीच मन जुडत.
  असच तर
  असत मनामनाच नात!

  प्रेमाचे भाव, दयेची साय
  दूर जरी असल
  तरी मनात भुरभुरत राहत
  असच तर
  असत मनामनाच नात!

  मन खर तर खूप कोमल असत
  पण सर्वांनाच ते समजत नसत!
  परीवाराच्या दिव्याला लागते
  आपुलकीची वात.
  असच तर
  असत मनामनाच नात!

  सर्वेच सारखे नसतात
  म्हणून खूप सांभाळून घ्यावं लागत.
  नात टिकावण्यासाठी प्रेमानं राहावं लागत!
  वेगळे असले तरी
  जुळतात संध्याकाळ अन् पहाट
  असच तर असत
  मनामनाच नात!

  कुटुंबात आणी नात्यात
  असेल जर सर्वांची साथ.
  उबदार असते मग
  असुष्याची पहाट!

  एका साठी सर्व, अन् सर्वांसाठी एक
  दिवस असो की रात!

  असच तर असत
  परिवाराच नात!
  असच तर असत
  मनामनाच नात!

  ©SmartSam

 • smartsam 48w

  स्पंदन!

  डोळ्याचे कौतुक करशील विशाल
  उमजतिल का तुला भाव लोचणी सखोल?

  सागराच्या लाटा सडेशिंपित समक्ष
  खोली मात्र जलधीचे न्याहलेळे कोण प्रत्येक्ष?

  आकाश तर पाहतो मी नित्य
  मावेना मनी मज काय आहे अंतरीक्ष!

  आईबाबांच्या कितीही
  जवळ असे ना!
  उलगडतील का कधी
  पालकांच्या अनमोल भावना!

  अश्रूंचे हि विलोप असतात आड हर्ष
  शब्दांचे ही होतात भावनांना स्पर्श!

  उमजतील का तुला रुध्याचे स्पंदन
  प्रेम् मिलनाची आपल्या अनमोल बंधन!
  उमजतील का तुला रुध्याचे स्पंदन
  प्रेम् मिलनाची आपल्या अनमोल बंधन!
  रुध्याचे स्पंदन!

  ©SmartSam

 • shamli_mali 51w

  आपण करतोय ते चूक की बरोबर ह्याचा निर्णय तिसऱ्या माणसाने कधीच घेऊ नये.
  मुळात तो निर्णय त्या 'आपण' मध्ये असलेल्या दोघांचा असतो. समाज मान्य नसेलही कदाचित पण म्हणून तो चुकीचा होत नाही.
  तो निर्णय गरज असू शकते, तो निर्णय आनंद असू शकतो, तो निर्णय त्यांचा वैयक्तिक असू शकतो आणि तो तसाच असला पाहिजे.
  समाज मान्य नाही म्हणून स्वतःचा आनंद माणसाने कधी सोडू नये, हा कदाचित त्यासाठी ती गोष्ट समाजा पासून लपवून ठेवावी लागू शकते.
  पण जर त्याने कोणाचंच आणि काशाचंच नुकसान होत नसेल तर आपल्या आनंदाला द्यावं प्राधान्य.
  त्याने आपण सुखात राहतो, आणि जो माणूस स्वतः सुखी असतो तोच दुसऱ्याला सुखी ठेऊ शकतो.

  ©shamli_mali

 • dnswords 59w

  ✍️...वक्त!

  अभी मरम्मत चल रही है झिंदगी की

  एक ऐसा भी दिन आयेगा

  की हमारे नाम का तुफान चल कर आयेगा!!

  ©dnswords

 • dnswords 61w

  आयुष्य

  "दुसऱ्याच्यां सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं या जगात कधीच एकटी नसतात"....!!!

  कुणाचा साधा स्वभाव
  म्हणजे त्याचा कमीपणा नसतो,
  ते त्याचे संस्कार असतात...?

  "आयुष्य मिळणे हा नशिबाचा भाग आहे."
  "मृत्यू येणे हा काळाचा भाग आहे. आणी"
  " लोकांच्या मनात जिवंत राहणे हा"
  " ज्याच्या त्याच्या कर्माचा भाग आहे."

  ©dnswords

 • dnswords 61w

  नकल

  किसीं की नकल career or future के लिये ना करे...

  फस गये, मर गये, हर गये,पिछे रह गये
  ये सिर्फ तुम्हारी वजह से होना चाहीए

  क्योकी उसके लिये Responsible भी तुम रहो गे
  और रास्ता निकाल ने वाले भी !

  ©dnswords