#marathiquotes

168 posts
 • dnswords 11w

  भले ही मी विश्वास ठेवतांना चुकत असेल

  पण प्रेम करतांना नाही

  नीट बघून करतो , म्हणजे पहिलीच शेवटची राहो ❤️

  ©dnswords

 • smartsam 32w

  गावरान मिरची!
  ��️��️��️

  लवंगी मिरची असो की ढब्बू
  मिरची तर पाहिजेच!
  ठेचा की लोणच
  टीचकन तर चव लागतेच!

  कधी खमंग तर कधी घ्या तर्री
  लाल, लाल कधी रस्सा सर्री!
  तिखट, तांबड कालवण
  आह! मटण रसयाची फुर्री!

  कोल्हापुरी रस्सा करी सर्रास,
  घ्या कोकणची आमटी!
  गावरान मिरची बटुक
  कोणा लागते जास्त
  कोणास तिखट भर चिमटी!

  असा खमंग सुवास दादा
  स्वयंपाक घरात!
  कधी यावं राव
  मांडीला मांडी पंगत,
  भाकर, कांदा, लोणच
  मटण मिरची जेवण झक्कास!

  सगळंच गोड तर काय
  जेवणाची मज्जा?
  झणझणीत जरा भावा
  घ्यावा तिखट गावरान रस्सा!

  झुरझुरनारी मिरची हिरवी
  की लाल मिरची लसणाचा ठेचा!
  याव राव सोबत आमच्या बी
  कधी जेवायला बसा!

  ©SmartSam

  @marathi_shabd #marathi #marathiwriters
  #marathiquotes
  @marathiwriters
  #mirakee_marathi
  @mirakee_marathi
  @mirakee #mirakee @mirakee

  Read More

  .

  .

 • smartsam 35w

  धुक!

  जिकडे तिकडे पडलय
  नुसत धुक!
  जीवन झालंय जणू
  नुसत फिक फिक्!

  जीवनात एके काळी
  होता लख्ख प्रकाश!
  आता मात्र वाटत
  नाही काही खास!

  आशा झिरल्या जणू
  पत्र्यावरच टीप टीप पाणी!
  चालले घरी लोक दूर
  आपल्या अनवाणी!

  लहानपण माझ गोड
  भरगच्च आशा, स्वप्न आणि सुख!
  जीवन आता मात्र
  फुसकटलेल धुक!

  ©SmartSam

  #mirakee #मराठी @मराठी_काव्य @मराठी #कविता @कविता @धुक @कविता_मराठी #मराठी_काव्य
  #marathiwriters
  #marathiquoteso
  #marathiwriters
  @marathiwriters
  #marathiquotes
  @marathiwriters

  Read More

  .

 • words_flake 38w

  ...

 • words_flake 38w

  ....

 • smartsam 39w

  फुल सावली !

  एक कळी गुलाबाची
  एक फुल जुईचे!
  गंध मोहक प्राजक्ताच्या बहराचा
  रंग आकर्षक कमळाचा!

  स्पर्श एक पावित्र्याचा
  नाजूक अलगत मोग्र्याचा!
  सुवास अविस्मरणीय अनामिक
  मनी रुजला निशिगंधेचा!

  स्मरणात माझ्या राहिली
  सदैव सौम्य चमेली!
  प्रेमाची जी ज्वालंती
  अप्रतिम ती शैवांती!

  पुष्पात पुष पारिजात
  दिन असो वा रात!
  तूच माझी पुष्पांजली
  तूच माझ्या स्मरणात!

  केवडा कधी दिसो
  पारणे डोळ्याचे फिटो!

  फुलबहर होवो वाफा
  लावीन मी सोनचाफा!
  बोली सर्व झाड अन् फुल
  कमळ, जास्वंद अबोली!

  अजून काय माझ्या फुला
  खर सांगू मी तुला!
  तूच सदाफुली माझी
  तूच माझी बकुळा!

  बहर झेंडू, गुलमोहराचा
  मनी तू पुष्प बाहुली!
  अशीच प्रिये प्रेम माझे तू रहा
  जीवनी माझ्या तू फुल सावली!

  ©SmartSam

  #marathi #marathiwritings
  #marathiquotes #marathikavita #marathipoems #life #poetry #thoughts

  Follow my writings on www.mirakee.com/smartsam #mirakee

  Read More

  .

  .
  ©smartsam

 • nephophile 40w

  ती - हासणं हो
  तो - नाही नको
  ती - हासणं कारण तुम्ही जेव्हा हसताना भलतेच
  गोड दिसता हो

  ©naturethoughtsandme

 • smartsam 43w

  हरवलेला माणूस!

  किती छान दिवस होते
  प्रेम होत किती बघा!
  दिवस असो की रात्र
  गोड आठवणी तेव्हा!

  एकत्र बसून गप्पा, गोष्टी
  आपुलकी, प्रेम अन् होत
  दया भाव किती!
  माणूसकी लोकांत होती
  माणसात होती निती!

  तंत्रज्ञान जरी इतकं न्हवत
  लोका लोकात दादा, ताई होत!
  अन् भावा भावात
  प्रेम खूप होत!

  सगळ असूनही आज लोक
  प्रेम, मायेची भुकेली!
  धाक, भीती, भ्याव ह्यातच
  लोक आज सारी पांगली!

  एकत्र येणं अन्
  सोबत उठण बसणं होत!
  आता काय म्हणे तर
  नुसत हसन खोटं फोटो असत!

  जीवाला जीव,
  खांद्याला खांदा होता!
  लोकात होत प्रेम
  माणुसकीत माणूस होता!

  आता सगळ झालंय जबर
  पण मायेची नाही खबर!
  सुखच नाही लोकांत
  पैसा, धन अमाप
  असेना का ढीगभर!

  सगळी काम करतेय मशीन
  काहीही यंत्रणास सांगेणा!
  माणूसकी मात्र हरवलिये
  खर प्रेम, माणूस खरा
  मात्र कुठ घावे ना!

  ©SmartSam

  #mirakee @mirakee
  @live_forever_young
  #poem
  #pod
  @writersnetwork
  #writersnetwork
  #writingcontest
  #creativearena
  @marathi #marathi
  #marathiwriters
  #marathiquoteso
  #marathiwriters
  @marathiwriters
  #marathiquotes
  @marathiwriters

  Read More

  .

  ©smartsam

 • words_flake 48w

  खोट बोलून मुंग्या गोळा
  करायची सवय नाही आम्हाला..

  ©nehabhavsar_quotes

 • smartsam 48w

  निकीता!

  आंब्याला जणू
  लागलाय मोहर!
  असाच सुंदर "निकु" तुझ्या
  ज्वाणीचा बहर!

  केस काळे लांब
  गोरा गोरा चेहरा!
  त्यात गजरा मोगऱ्याचा
  तुझ्या केसात साजरा!

  तूच माझं प्रेम
  तूच माझी कविता
  तूच माझी राणी
  तूच माझी निकीता!

  ©SmartSam

 • smartsam 48w

  यहोवाची किमया!

  नाजूक तुझा बांधा
  कोरीव तुझी काया!
  अदभुत सृष्टी अशी
  मोहक अती प्रिया!

  कंबर किती नाजूक
  हर कटाक्ष बघते लाजून!
  अंबरापरी सुंदर
  राहतेस प्रिये उभी
  पदर जेंव्हा घेऊन!

  नयन किती प्रांजळ
  स्मित फुलापरी अनमोल!
  अनंत आभार देवाचे
  किती अनमोल असीम
  यहोवा देवा तुझी किमया!

  ©SmartSam

 • p_pranali 49w

  "काही अडतं का ग प्रेमाशिवाय?"

  "माहिती नाही. पण माझं अडतं जेव्हा तू नसतेस.
  उगीच काळजी वायला लागते तुझी. मला तर तुझ्याशिवाय गमत सुद्धा नाही.
  जर आपल्या मैत्रीला प्रेम म्हणतात तर नक्कीचं अडतं प्रेमाशिवाय, तुझ्याशिवाय."

  ©p_pranali

 • p_pranali 50w

  सुखाच्या सरीत तर सगळेचं सोबतीला असतील,
  दुःखाच्या लाटांमध्ये सोबत वाहू देशील कायं ?
  प्रेमाच्या ओंझढीतं मोत्या प्रमाणे जपून ठेवेल,
  सांग तू माझा होशील कायं ?

  -Pranali

  #marathi #marathiquotes

  Read More

  सुखाच्या सरीत तर सगळेचं सोबतीला असतील,
  दुःखाच्या लाटांमध्ये सोबत वाहू देशील कायं ?
  प्रेमाच्या ओंझढीतं मोत्या प्रमाणे जपून ठेवेल,
  सांग तू माझा होशील कायं ?

  ©p_pranali

 • smartsam 50w

  प्रिये

  एक चित्र सुंदर पाहिलं
  मन जडून त्यावर राहील!
  वेळ काढूनच जणू यहोवा देवाने
  हे प्रात्यक्ष सुंदर कोरल!

  डोळे मोठे काळेभोर
  गाल मऊ उबदार!
  गोडगुलाबी खांद्यावर
  मखमल केसांची झालर!

  दिवस नवा जो आला
  अंधार निषेचा गेला!
  मन मनातच हर्षले माझे
  चेहरा सुंदर तुझा जो पाहिला!

  तुझी स्मृती मनात राहिली
  क्षणापासून ज्या तुला मी पाहिले!
  हे काव्य मधूप्रिये
  तुझ्याच साठी मी वाहिले!

  हे काव्य मधूप्रिये
  तुझ्याच साठी मी वाहिले!
  एक चित्र सुंदर पाहिलं
  मन जडून त्यावर राहील!

  एक चित्र सुंदर पाहिलं
  मन जडून त्यावर राहील!

  ©SmartSam

 • vasubandhu 50w

  ©Vasubandhu

 • smartsam 50w

  सुखी रहा !

  लक्षात ठेवा नेहमी
  आपले भावनिक स्वातंत्र्य!
  नम्रपणा जीवनात आणी
  गरीब ही मित्र!

  विसरू नका कधी
  आपली वायत्तिक जबाबदारी!
  तसच सकाळचा चहा,
  नाष्टा आणी न्याहरी!

  भेटा त्यांना
  जे असतील गरजवंत!
  सगळ्यांवर करा प्रेम नाही फक्त
  सुंदर आणी श्रीमंत!

  लक्षात असो नेहमी
  आपल्या जीवनाचा उद्देश!
  कार्य करा मेहनतीने
  होऊ दे तुमचे लक्ष सिध्दीस !

  जाण ठेवा आपली
  माणूस असण्याची!
  एखाद्याला जमेल ती
  मदत करण्याची!

  नम्र, प्रेमळ आणी प्रेम भाव ठेवा!
  आनंदी, समाधानी आणी स्वस्थ रहा!
  उद्याचे तथ्य आजच डोळ्यात पहा.
  जीवनात असो उद्देश नी आनंद
  सदा सुखी रहा !

  ©SmartSam

 • smartsam 50w

  अंजली!

  बाजूला माझ्या उभी
  जी तू राहीलीस!
  साजली अंगावर माझ्या जणू
  तुझ्या केसांची सावली!

  सार शहर फिरलो
  एकच मला पावली!
  तुझ्या सारखी साजरी
  एकच तू अंजली!

  अबोल तुझे डोळे
  गोड गोफेल चेहरा!
  हळुवार समीप तुझ येणं
  पण आता माझ्यावर ही पेहरा!

  नाजूक तुझा बांधा अन्
  मनात लपलेली भावना!
  पाहिल्या विना तुला
  आता अंजु मला राहवेना!

  अमावस्या च्या ही राती
  उगवला जणू चंद्र!
  अलगद तुझी पावलं अंजु
  करी मला मंत्रमुग्ध!

  तुझ्यात माझ्यात अंजु
  आता अंतर नको हे!
  अलगद लाजात समीप
  राणी जवळ माझ्या तू ये!

  उमलली एक नाजूक कळी
  एव्हाना फुल नाही फुलले!
  आठवणीत अनंत
  अंजु माझी अंजली
  अबोल तुझ प्रेम
  अनंत दडून राहिले!

  अंजु!


  ©SmartSam

 • rushideshmukh23 53w

  क्षितिजाशी भास्कराच्या निरोपाला
  यामिनी ने चंद्रकोर ल्यावी
  नभाच्या गाली लाजेने लाली चढावी
  काळोखाने हळूच येऊन चांदण्याची चादर पसरावी
  हवेतील गारव्याने निसर्गाला तंद्री चढावी
  आणखी काय हवे प्रेमात पडायला |
  -Rushikesh Deshmukh

  IG- THEPEERLESSTHOUGHTS

 • smartsam 54w

  माझ गाव!

  अलगद झुलणारी फुल
  आठवणींचा ठेवा!
  एकदा तरी पाहुंण आमच्या
  गावाला यावं!

  निळनिळ आकाश
  सूर्य किरणांचा प्रकाश!
  अजुन ही आहे बऱ्याच
  लोकांत विश्वास!

  गुलमोहराचा वाफा दादा
  न्याहळून तर पहावं!
  एकदा तरी पाहुंण आमच्या
  गावाला यावं!

  झुकलेली नारळाची झाड
  संथ वाहे शुद्ध हवा!
  जिकडे तिकडे
  हरवगार रान तुम्ही पहा!

  आमरस गोड गोड जणू प्रेमाचा घास
  गाव सर फिरू, आनंदान पाटावर पोहाव!
  एकदा तरी पाहुंण आमच्या
  गावाला यावं!

  सुशिक्षित लोक, हसत खेळत लेकर
  गाई, म्हशी, कोंबड्या, बकऱ्या अन् मेंढर!
  हिरवगार रान, बघा फुलांचा बहर
  शहरा वाणी नाही दादा
  मनभरून आमच्या कडे राहावं!
  एकदा तरी पाहुंण आमच्या
  गावाला यावं!

  पाटावर जाऊ, ऊस वाटेत तोडून खाऊ.
  मोर ही आहेत रानात, झुंड पारव्यांचा पाहू!
  माझं गाव खूप सुंदर,
  जिकडे तिकडे प्रेमाचा साजार!
  गवतावर झिरपत मोत्या सारख दवं
  एकदा तरी पाहुंण आमच्या
  गावाला यावं!

  सुखात नांदती सूना
  नंदा, जावत नाही काही उना!
  घराघरात माया
  प्रेम भावाभावतल पहावं
  एकदा तरी पाहुंण आमच्या
  गावाला यावं!

  लोक आहेत साधी
  पण प्रेम आहे खूप!
  नाही मिळणार दादा
  कोंडलेल्या शहरात अस सुख!
  निसर्गाच्या सानिध्यात मिसळून तर पहावं!
  एकदा तरी पाहुंण आमच्या
  गावाला यावं!

  जास्त नाही मोठ
  आहे तस छोट!
  रातराणात अलगद काजव्यांचा प्रकाश
  पहाटे पहाटे ऐकावी
  किलबिल पाखरांची गोड!
  एकदा तरी पाहुंण आमच्या
  गावाला यावं!

  नाही काही प्रदूषण
  नाही गर्दी कोंडीच दडपण!
  घरी अंगण सरपण
  घरा समोर पटांगण.
  प्याव गोड पाणी
  थंड भरलया रांजण!
  एकदा तरी पाहुंण आमच्या
  गावाला यावं!

  फेटा, लुगड, खमिज
  आहे जुनी ठेव!
  चावडी, बाझार, हिरवं रान!
  हिरवगार वावर, चुलत्या सारवती अंगण, वहिनी मोडती सरपर्ण.
  सर्वीकडे प्रेम, आनंद पहावं!
  एकदा तरी पाहुंण आमच्या
  गावाला यावं!

  खूप आहे सुंदर माझं गावं
  एकदा तरी पाहुण आमच्या
  गावाला यावं!
  करू सगळी सोय
  तुम्ही हो तर म्हणावं!

  एकदा तरी पाहुंण आमच्या
  गावाला यावं!
  एकदा तरी पाहुंण आमच्या
  गावाला यावं!

  ©SmartSam

 • smartsam 55w

  नात!

  शब्दांनी तुटत मन
  शब्दांनीच मन जुडत.
  असच तर
  असत मनामनाच नात!

  प्रेमाचे भाव, दयेची साय
  दूर जरी असल
  तरी मनात भुरभुरत राहत
  असच तर
  असत मनामनाच नात!

  मन खर तर खूप कोमल असत
  पण सर्वांनाच ते समजत नसत!
  परीवाराच्या दिव्याला लागते
  आपुलकीची वात.
  असच तर
  असत मनामनाच नात!

  सर्वेच सारखे नसतात
  म्हणून खूप सांभाळून घ्यावं लागत.
  नात टिकावण्यासाठी प्रेमानं राहावं लागत!
  वेगळे असले तरी
  जुळतात संध्याकाळ अन् पहाट
  असच तर असत
  मनामनाच नात!

  कुटुंबात आणी नात्यात
  असेल जर सर्वांची साथ.
  उबदार असते मग
  असुष्याची पहाट!

  एका साठी सर्व, अन् सर्वांसाठी एक
  दिवस असो की रात!

  असच तर असत
  परिवाराच नात!
  असच तर असत
  मनामनाच नात!

  ©SmartSam