#marathipoem

174 posts
 • neha_warang 6w

  निरोपाची आरती घेता अश्रू धरले मना,
  बाप्पाचेही डोळे जणू बोलित होते भावना,
  विसर्जनाची घटिका आली बाप्पा गेले पाण्या,
  कैलाशे गमन करी तुजविण मखर झाला सुना,
  पुनश्च हरिओम होईल तुझा, पुन्हा येईल घरा शोभा,
  गणपती बाप्पा मोरया!
  पुढच्या वर्षी लवकर या!
  ©neha_warang

 • yash17 24w

  आयुष्य ❤

  आयुष्य खूप सुंदर आहे
  बस जगता आलं पायजे
  कसले च न विचार करता
  आज ला जगता आलं पायजे

  मानखुलास हसायचा
  बिंदास लाडायचा
  येईल तयाला समोर जायचं
  पण मात्र रडायचा नय

  आयुष्यात काही गोष्टी
  मिळणार काही सुटणार
  जे भेटायला तयाचे आभार
  म्हणून फुडें चालत रहावे

  स्वतःला आनंद   बगनय पेक्षा
  अप्लाय जावंचय लोकांना कशायत
  आनंद भेटतो टायचंय प्रयत्न करा
  जगणं खूप सोपं होऊन जातो मग

  नि स्वार्थी जगन
  बस चेराय वर एक हसू
  आणि फुडें चालत जाणे
  हायला तर आयुष मानतात ना
  ©YashThakur17

 • marathi_shabd 27w

  अनुबंध

  हवेचा झुळूक आहे
  पण त्यात तुझा सुगंध नाही

  हसतो आहे येथे, पण
  तुझं हसण्या सारखा छंद नाही

  मी आहे जसा; तसाच आहे, पण
  का? मी आज, बेधुंद नाही

  उत्साही असलो जरी, पण
  तुझं सोबती सारखा आनंद नाही

  मी शरीराने जरी येथे, पण
  माझा जीव त्यात बंध नाही

  हृदयाचे ठोके जरी सुरू, पण
  चालतात थोडेसे ते मंद काही

  हो सुप्री तुझं शिवाय
  माझ्या हृदयाचा अनुबंध नाही.

  ©ग सु देवकत्ते

 • words_flake 28w

  आयुष्यला अर्थ देते ती मैत्री
  आयुष्यात रंग भरते ती मैत्री
  आयुष्य सुंदर बनावते ती मैत्री
  आयुष्याच्या कठीण प्रसंगात आनंदाने जगायला शिकवते ती मैत्री...

  ©nehabhavsar_quotes

 • manisha_the_eternal_love 41w

  फक्त तु...

  आलेस तु माझ्या आयुष्यात...
  जसे चांदण्यात चंद्र शोभावा...।
  तुझ्या येण्याने माझ्या...
  आयुष्याला अर्थ यावा...।

  देवाने दिलेली भेट आहेस तु अनमोल...
  म्हणुन च आहेत सुंदर माझे सारे क्षण...।

  प्रेमाची व्याख्या मला तुझ्यामुळे च कळले...
  जगणं एवढ छान असतं हे तुझ्या येण्याने च उमगले...।

  हवी आहेस तु मला सात ही जन्मी...
  करेन नव्याने प्रेम पुनः पुन सांगतो या वचनी...।

  भावते मला प्रत्येक क्षणी तुझे ते दिसणे...
  तुझा तो विश्वास आणि ते निखळ हसणे...।
  तुझे निस्सीम प्रेम आणि तुझी साथ...
  तुझ्यातच अडकला आहे माझा प्रत्येक श्वास...।

  तु आलीस माझ्या आयुष्यात...
  आयुष्य माझ बहरून गेलं...।
  जशी फुलावी बाग गुलाबाची...
  असच काहीस होऊन गेलं...।

  तु सोबत असताना मला...
  गरज कोणाची लागत नाही...।
  तु फक्त सोबत रहा...
  मी दूसर काही मागत नाही...।

  तुला पाहताच मी मलाच विसरतो...
  विसरून मी स्वतःला तुझाच होऊन जातो...।

  असच नाही आयुष्यात सगळ घडतं...
  नशीब लागत तेव्हा कुठे अस खरं प्रेम भेटतं...।

  ©manisha_the_eternal_love

 • kapsnharsh 53w

  सुख

  सुख मानण्यात आहे
  सुख जानण्यात आहे
  सुख समजण्यात आहे
  सुख समजावण्यात आहे

  बाळाच्या हलणाऱ्या पाळण्यात आहे
  मंदिराच्या घुमणाऱ्या घंटा नादात आहे
  भक्तांच्या तल्लीन भक्तीत आहे
  सोसणाऱ्या आईच्या प्रसव वेदनेत आहे

  सुख भटकणाऱ्या यात्रेत आहे
  सुख आईच्या खमंग जेवणात आहे
  सुख थकलेल्या शरीराच्या शांत झोपेत आहे
  सुख प्रत्येक यशस्वी स्वप्नात आहे

  प्रेयसीचे प्रियकराच्या बाहूपाशात आहे
  लेकरांच्या यशात पालकांचे निस्वार्थ आहे

  सुख मिळते प्रत्येकास
  सुख असते आसपास
  सुख कोसळणाऱ्या अश्रूत
  सुख खिळवून ठेवणाऱ्या संगीतात।

  आठवणी म्हणजे सुख
  साठवणी म्हणजे सुख
  मित्रमैत्रिणी म्हणजे सुख
  वैराग्य म्हणजे सुख
  बालहट्ट म्हणजे सुख
  बेभान तारुण्य म्हणजे सुख
  ©kapsnharsh

 • yogesh_shedge09 57w

  तेव्हाही पाहायचो तुलाच
  आजही तुलाच पाहतो,
  तेव्हा मात्र जरा लांब
  आज मात्र सोबत असतो...

  ©yogesh_shedge09

 • sandeepbapat 59w

  माझी माय

  सांगायाची माय माझी
  आहे शिकायचे तुला
  तुझ्या चिमुकल्या हाती
  धुणी भांडी नको बाळा

  सांगायाची माय माझी
  कष्ट काबाड करीन
  ओझं पुस्तकांचं तुझ्या
  डोक्यावरती वाहीन

  सांगायाची माय माझी
  जग लई हे वंगाळ
  आबरुला प्राणाहून
  माझे बाई तू संभाळ

  सांगायाची माय माझी
  शब्द आपुले सोबती
  दोन गोड बोल तुझे
  नाती कितीक जोडती

  सांगायाची माय माझी
  नको हार कधी मानू
  दुःखं कितीक येतील
  नको डोळा पाणी आणू

  सांगायाची माय माझी
  उंच होशील शिकून
  तरी धरतीशी नाते
  ठेव घट्ट तू धरून...

  तरी धरतीशी नाते
  ठेव घट्ट तू धरून
  ©sandeepbapat

 • itsmanu 60w

  ..

 • yogesh_shedge09 60w

  चारी दिशात तू
  वाटे का मजला,
  असे चाहूल तुझी
  भास वाटे मनाला...

  विसरुनी जावे स्वतः
  याद येती मना,
  चारी दिशा तुझी
  आतुर तुज भेटण्या...

  ©yogesh_shedge09

 • yogesh_shedge09 61w

  सर्वांपेक्षा ती नक्कीच वेगळी होती
  सहज ती जाणवणारी होती,
  जस, कडकडत्या उन्हात सावली
  तशी ती थंडी गुलाबी होती...

  ©yogesh_shedge09

 • kapsnharsh 62w

  दुःख

  भावनेच्या गर्भात नको असणाऱ्या दुःखाचा जन्म होतो।
  सुखाच्या शोधात पिच्छा पुरवणाऱ्या दुःखाचा आवाका वाढत जातो।
  जेव्हा भेटते सुख तेव्हा का कुणास ठाऊक आनंद मनापासून होत नाहीच..,
  गमावण्याची सवय आणि कष्टाचं जीवन हळूहळू मनात खोल रुततच जाते ..
  सुखापुढे आता दुःख जिंकत जाते. ..
  अन् जन्मलेल्या दुःखाला माणूस कवटाळून बसतो।।

  कवी - क. दि. रेगे
  ©kapsnharsh

 • sachinwrites 65w

  ©sachinwrites

 • panchshila 67w

  ... आज काय?

  रात्रंदिनी
  काहूर मनी
  संध्या येई
  दाटे भीती

  एकच प्रश्न, एकच सवाल
  "जगावं की मरावं" म्हणणार्‍या
  शेक्सपियरला ही करेल बेहाल

  वाटे Oliver Evans पासुन
  James Sharp सगळ्यांना उभा करावे
  विचारावे रोज नवे काय शोधावे?
  व्यक्ति तितक्या तर्‍हा कसे सांभाळावे?

  घरी असो की ऑफिस
  जागे असो वा झोपेत
  तोच प्रश्न तोच सवाल
  "... आज स्वयंपाकात काय बनवणार???"
  ©panchshila

 • ink_envisions 71w

  मी आयुष्याच्या अंधारात, तुला किरणात पाहिले...��
  .
  .
  .
  .
  #mirakee #poem #words#marathipoem#poetry #love #kavita # #love #inspiration #diary #thoughts #poetry #life

  Read More

  भेट स्वप्नातली तुझी,
  मी अक्षरात उतरवली,
  ऐकुन जा तूही कधी,
  जे शब्द आहे माझ्या मुखी....

  ~Ink_Envisions

 • panchshila 71w

  ©panchshila

 • sandesh_sogam 73w

  कुजबुज होती कानांत
  पाऊस खूप लवकर येणार आहे,

  तू दूर गेलीस निघून
  खरंतर हे दुःख त्यालाही अनावर आहे!!

  - © संदेश चंद्रकांत सोगम.

 • mrunal_as_mukhtalif 75w

  मराठी गझल... कविता कशी वाटली ते नक्की कळवा..

  #marathi_shabd #marathikavita #marathi #devnagriscript #marathipoem #mirakee

  Read More

  तुझेच होते...

  नव्या प्रितीचे गीत न्यारे तुझेच होते...
  निळ्या अंबरीचे चंद्र-तारे तुझेच होते...

  तो उन्हाचा शुष्क छळवाद तुझाच होता...
  श्रावणाचे ते गुलाबी इशारे तुझेच होते...

  चालूनी सुखाने जिथे हे पाय जाळले मी...
  त्या कोवळ्या फुलांचे निखारे तुझेच होते...

  तेव्हा मुक्याने तू , का गाळलेस अश्रू?
  अंतरी टोचणारे शब्द सारे तुझेच होते...

  आज वादळांचा भलता सुकाळ आहे...
  ते कालचे धुंद वारे तुझेच होते...

  © मृणाल भोयर

 • kapsnharsh 75w

  निस्तेज

  हर रोज की तरह डूबता सूरज आज भी निस्तेज
  अब हर कोई मिलाता है आँखे सूरज का लेने तेज।
  जब चांँद दे रहा है दस्तक, रात के दरपर चांँदनी के साथ
  अंधेरा निभाता है चांँद - चांँदनी का रात भर का साथ ।
  तब धरती पर हर एक आँख होती है नींद के बाहो में निस्तेज
  और हर कोई साथ अपने प्रियतम के बाहो मे लेता है तेज।
  कवि - क.दि.रेगे
  ©kapsnharsh

 • anjaan_an_expression 76w

  On the occassion of mothers day few lines in my Mother tongue Marathi. Happy Mother's Day ����

  #happymothersday #marathipoem #marathikavita #marathiwriters #loveyoumom #mirakee #writersofindia #love #life #poetry

  Read More

  आई

  बोट धरून चालवते तशी इंटरव्ह्यूलाही पाठवते
  आई स्वतः त्रास घेऊन आपल्याला घडवते
  चार भिंतीत राहून जग दाखवत असते
  पहिली गुरु आणि मित्र आईच असते

  ती रागावण्याची भीती आयुष्यभर वाटत राहते
  तिच्या त्या रागातही आपलीच काळजी राहते
  आपल्या सर्व चुकांसाठी तिथे क्षमाच असते
  आईपेक्षा देवपण वेगळे ते काय असते

  या गर्दी मध्ये एकटेपण नेहमी जाणवते
  मोठे झालो तरी दुःखात तीच आठवते
  काही लागलं की आईकडेच धाव असते
  अनोळखी शहरामध्ये हक्काचं ती गाव असते

  आपल्या नुसत्या चाहुलीने तिचे आयुष्य फुलते
  जन्मण्या आधी पासून आपल्यावर प्रेम करते
  जग बघण्या आधी आपलं जग असते
  ते सुंदर जग म्हणजे आई असते

  ~अनजान~

  ©anjaan_an_expression