#marathikavita

424 posts
 • likhitvaat 2w

  का?

  बोललासच नाही काही
  तुझ्या डोळ्यात जे मी पाहिलं होतं.
  लांबुनच पाहत राहिलास फक्त
  आणि डोळ्यातलं डोळ्यातच राहिलं.
  - लिखित वाट
  ©likhitvaat

 • neha_warang 4w

  निरोपाची आरती घेता अश्रू धरले मना,
  बाप्पाचेही डोळे जणू बोलित होते भावना,
  विसर्जनाची घटिका आली बाप्पा गेले पाण्या,
  कैलाशे गमन करी तुजविण मखर झाला सुना,
  पुनश्च हरिओम होईल तुझा, पुन्हा येईल घरा शोभा,
  गणपती बाप्पा मोरया!
  पुढच्या वर्षी लवकर या!
  ©neha_warang

 • __marathi_thoughts_ 8w

  आयुष्याने रडवलं
  परिस्थितीने शिकवलं
  कोसळला जरी ढुःखाचा डोंगर
  मित्रांनी सावरलं

  ©__marathi_thoughts_

 • __marathi_thoughts_ 8w

  स्वतःला कोणत्या गोष्टी आनंद देतात हे समजून
  घ्यायला बाहेर नाही तर स्वतःमध्ये डोकावून पाहावं !


  ©__marathi_thoughts_

 • __marathi_thoughts_ 8w

  जीवन अवघे वाया गेले तरीही जगण्याची धडपड होतच आहे,

  धडपड होऊनी जीवाची

  तरीही शोध सुखाचा घेतच आहे..!
  ©__marathi_thoughts_

 • __marathi_thoughts_ 8w

  गमावल्यानंतरच कळतं
  वेळ,
  व्यक्ती
  आणि संबंध किती मौल्यवान होते.....
  ©__marathi_thoughts_

 • mohit09 20w

  राते

  रात हुई बात हुई ,
  तेरी मेरी कूछ पल बात हुई ,

  चाँद को जरा रोक लो ,
  हमारी बात पूरी कहाँ हुई,

  सूरज को कहो थोड़ा देर से निकले,
  खामोश हुई रात जब तुझे बात हुई ,

  थोड़ा रोक लो इस समय को ,
  अभी तेरे मेरे बात पूरी कहाँ हुई ....
  ©mohit09

 • smartsam 25w

  फुल सावली !

  एक कळी गुलाबाची
  एक फुल जुईचे!
  गंध मोहक प्राजक्ताच्या बहराचा
  रंग आकर्षक कमळाचा!

  स्पर्श एक पावित्र्याचा
  नाजूक अलगत मोग्र्याचा!
  सुवास अविस्मरणीय अनामिक
  मनी रुजला निशिगंधेचा!

  स्मरणात माझ्या राहिली
  सदैव सौम्य चमेली!
  प्रेमाची जी ज्वालंती
  अप्रतिम ती शैवांती!

  पुष्पात पुष पारिजात
  दिन असो वा रात!
  तूच माझी पुष्पांजली
  तूच माझ्या स्मरणात!

  केवडा कधी दिसो
  पारणे डोळ्याचे फिटो!

  फुलबहर होवो वाफा
  लावीन मी सोनचाफा!
  बोली सर्व झाड अन् फुल
  कमळ, जास्वंद अबोली!

  अजून काय माझ्या फुला
  खर सांगू मी तुला!
  तूच सदाफुली माझी
  तूच माझी बकुळा!

  बहर झेंडू, गुलमोहराचा
  मनी तू पुष्प बाहुली!
  अशीच प्रिये प्रेम माझे तू रहा
  जीवनी माझ्या तू फुल सावली!

  ©SmartSam

  #marathi #marathiwritings
  #marathiquotes #marathikavita #marathipoems #life #poetry #thoughts

  Follow my writings on www.mirakee.com/smartsam #mirakee

  Read More

  .

  .
  ©smartsam

 • marathi_shabd 26w

  अनुबंध

  हवेचा झुळूक आहे
  पण त्यात तुझा सुगंध नाही

  हसतो आहे येथे, पण
  तुझं हसण्या सारखा छंद नाही

  मी आहे जसा; तसाच आहे, पण
  का? मी आज, बेधुंद नाही

  उत्साही असलो जरी, पण
  तुझं सोबती सारखा आनंद नाही

  मी शरीराने जरी येथे, पण
  माझा जीव त्यात बंध नाही

  हृदयाचे ठोके जरी सुरू, पण
  चालतात थोडेसे ते मंद काही

  हो सुप्री तुझं शिवाय
  माझ्या हृदयाचा अनुबंध नाही.

  ©ग सु देवकत्ते

 • p_pranali 30w

  सोडून आले त्या स्वार्थी जगाला तिथे,
  माणुसकिची दोरीला गाठ पडली जिथे.
  तुटलेल्या भावनांच्या विस्कटल्या हृदयाला,
  प्रकाश होता फक्त त्या निस्वार्थी चंद्राचा
  आणि साथ होती कलात्मक लेखणीची.
  लिहीत बसले जीवनाच्या आठवणींना,
  आणि शोधतं बसले स्वतःच्या अस्तित्वाला.

  ©p_pranali

 • kapsnharsh 37w

  आई होणार मी

  मज डोहाळे लागले
  चिमुकल्याच्या आगमनाचे मज डोहाळे लागले

  स्त्रीत्वाची ओळख खरी माझी मला पटली
  मातृत्वाची सुंदर देणगी निसर्गाने मला दिली

  नऊ महिने नऊ दिवस वाट मी पाहते मज बाळाची
  वेदना संवेदना भावना माझ्या जपते, होणार आई मी बाळाची

  बाळाच्या बाबांनी दिली मज ही भेट प्रेमाने
  बाबा बाळाचे मिरवतात फुशारकी अभिमानाने

  डोहाळे आजी-आजोबांनाही लागले
  म्हातारपनीची काठी अन् बोबडे बोल ऐकू येऊ लागले

  नवनवीन नाते घेऊन येणार बाळ माझे
  मज डोहाळे लागले
  चिमुकल्याच्या आगमनाचे मज डोहाळे लागले।
  कवी - क.दि.रेगे
  ©kapsnharsh

 • rushideshmukh23 39w

  क्षितिजाशी भास्कराच्या निरोपाला
  यामिनी ने चंद्रकोर ल्यावी
  नभाच्या गाली लाजेने लाली चढावी
  काळोखाने हळूच येऊन चांदण्याची चादर पसरावी
  हवेतील गारव्याने निसर्गाला तंद्री चढावी
  आणखी काय हवे प्रेमात पडायला |
  -Rushikesh Deshmukh

  IG- THEPEERLESSTHOUGHTS

 • ashwinilike 39w

  पुन्हा भेटू... जखमेसह...
  काव्य✍: © अश्विनी लिके
  आपण भेटू...
  इकडच्या तिकडच्या गप्पा करू...
  इकडे तिकडे पहात...
  समोरासमोर असून...
  समोर न पाहता...
  बोलू....
  आपण भेटू...
  आपण बोलू...
  जे बोलायला हवे आहे,
  जे बोलायला हवे होते...
  ते बोल टाकून.
  होय,
  समोरासमोर असेपर्यंत
  जाणवणार नाही ते,
  जे एकटेपणा जाणवते...
  एक जखम
  प्रत्येक भेटीत खोल होत जाणारी...
  त्याबद्दल,
  पुढच्या भेटीत बोलू...
  बोलूनही काय उपयोग???
  या प्रश्नाने अजूनच,
  खोल होत जाणारी जखम...
  मग शांतताच शांतता.
  स्मशानशांतता म्हणतात तीच.
  मनातल्या मनातच हिशोब...
  हे बोलायचे होते,
  ते बोलायचे होते...
  याचा विचार करताना,
  क्षण भरतात...
  क्षण सरतात...
  चला मग पुन्हा भेटू.
  टाटा...बाय बाय...
  पाठमोरे होऊ आपण.
  समोरासमोर असूनही
  कधी समोर होतो आपण?
  पाठमोरे होताना
  पाठीला फुटलेले डोळे...
  डोळ्यांना फुटलेले झरे...
  लपवून ठेवत राहू...
  जपून ठेवत राहू.
  ती ठसठसत खोलवर जाणारी जखम...
  अर्धवट भेटीच्या दोर्‍याने
  पुन्हा एकदा शिवून टाकू.
  खूप खोलवर काही हलले आहे,
  या हलण्याची जाणीव,
  असेल तुला?
  तुला जाणवली कधी माझी जखम?
  तुझ्याकडे आहे ज्याचे मलम...
  माझ्याकडे आहे,
  डोळ्यांना फुटलेल्या
  खारट झर्‍यातील मीठ!
  हे मीठच मलमासारखे वापरायचे!
  तुझेही असे आहे का?
  हे विचारायला हवे होते.
  पण विचारूनही काय उपयोग?
  झऱ्यांचे अवकाळी आयुष्य..
  समुद्र बारमाही असतात...
  भावनांचे झरे हरवत‌ असतात,
  कर्तव्याच्या समुद्रात.
  आपण हरवून टाकू आपल्याला..
  जखमेसह.
  पुन्हा भेटू
  जखमेसह...
  ©ashwinilike

 • p_pranali 39w

  एक नातं होतं माझं, माझ्या हृदयाशी.
  विश्वासाचं, हक्काचं, प्रेमाचं.
  ज्यात त्यानी मला नवीन नात्यांची ओढख पटवून दिले.
  खूप गोड वाटायचा यांचा सहवास,
  आणि मी सुद्धा पूर्णपणे रमून गेले.
  नात्यांचा लाटांमध्ये वाहून खूप दूर निघून आले,
  जिथनं मागे वढून बघितलं तर फक्त अनुभवांचा भार होता.
  चांगले अनुभव हृदयस्पर्शी ठरले व वाईट दुःखद.
  काट्यात अडकलेला कापड सोडवता येतो,
  पण भावनेत गुंतलेलं मन नाही.
  त्रास फक्त हृदयालाच,
  जो क्षणो-क्षणी तुटतो अपेक्षेच्या ओंजळीत लपून,
  भावनेला सहारा देऊन.
  सोडून दिलं हृदयानी अपेक्षा ठेवणं,
  आणि मी विश्वास.
  कारण अश्रूंची शिकवण होती कोणीच कुणाचं नसतं.

  ©p_pranali

 • kapsnharsh 41w

  शहर

  नुसतच उंचच उंच इमारतींनी भरलं आहे शहर
  तितकच माणूसकीनी शून्य झालं आहे शहर।

  शहरातले रस्ते रुंदच रुंद होत आहे
  फुटपाथवर मात्र शहराची गरिबी दिसत आहे।

  पैसाच पैसा वाहतो आहे शहराचा विकास होतो आहे
  कुणाचे तरी रक्त कुणाचा घाम या पैशात झिरपत आहे।

  एक एक गाव सामावत शहराच्या सीमा वाढत आहे
  गावकरी शहराच्या विकासासाठी आपल्या जमिनी विकत आहे।

  जमिनीच्या पैशात गावकरी शहरात गाडी-बंगला घेत आहे
  शहरातली माणसं मनःशांतीच्या शोधात गावोगाव भटकत आहे।

  कष्टकरी जनता रोजगारासाठी धडपडत आहे
  सरकारी रोजगार योजनांनी फक्त भ्रष्टाचार फोफावत आहे।

  गरीब शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक फासावर लटकत आहे
  आणि ह्या आत्महत्यांचे भावनिक भांडवल करुन नेते पुन्हा आपली 'वोटबँक' वाढवत आहे।

  नुसतच उंचच उंच इमारतींनी भरलं आहे शहर
  तितकच माणूसकीनी शून्य झालं आहे शहर।

  क.दि.रेगे
  ©kapsnharsh

 • itsmanu 42w

  .

 • omesh_satbhai 42w

  बिखरा मन

  शब्दों का इस्तेमाल बहुत संभालके करना जनाब,
  रिश्ते खराब करने का जहर है ये ।
  समय भर देगा घाव आसानी से,
  पर मन के ज़ख्म जो समय को भी ज़ख्मी कर देते है ये ।
  क्या वो बुनियाद जो एक झटके में डगमगा जाए,
  आजकल रिश्तों से महंगे बाजार में फूल हो गए ।
  ये ख़ामोशी भी अजीब सी चीज़ है,
  बिखरे रिश्ते जोड़ने से ज्यादा तोड़ने का मातम छा देती है ये।
  रिश्तों की एहमियत सीख लो जनाब क्योंकि,
  बिखरे मन और टूटी डोर अक्सर टुकड़े ही रहते है ।
  सीख रहे है यही पंक्तियां हम भी, क्योंकि अपने अजनबी बन जाएं तो अपनी ही गलतियां मन को मौत देती है ।।
  ©omiee_satbhai

 • p_pranali 44w

  कळी उमलण्याची वेडा चंद्र वाट बघत होता
  कळी उमलणारच असा त्याचा विश्वास होता
  सकाळ झाली, कळी उमललेली
  पण हे पाहण्यास वेडा चंद्र कुठे होता.
  -अज्ञात

  चंद्र निघण्याची नाजुक कळी वाट बघत होती
  तिच्या निर्मळ पाकळ्यांच्या ओंजळीत
  चंद्रसावलीला रंगवावं तिचं स्वप्न होतं
  ती वाट बघत राहिली, सकाळही झाली
  पण तिचं प्रेम अमर करायला वेडा चंद्र कुठे होता.
  -प्रणाली

  #marathi #marathiquotes #marathikavita @odysseus

  Read More

  कळी उमलण्याची वेडा चंद्र वाट बघत होता
  कळी उमलणारच असा त्याचा विश्वास होता
  सकाळ झाली, कळी उमललेली
  पण हे पाहण्यास वेडा चंद्र कुठे होता.
  -अज्ञात

  चंद्र निघण्याची नाजुक कळी वाट बघत होती
  तिच्या निर्मळ पाकळ्यांच्या ओंजळीत
  चंद्रसावलीला रंगवावं तिचं स्वप्न होतं
  ती वाट बघत राहिली, सकाळही झाली
  पण तिचं प्रेम अमर करायला वेडा चंद्र कुठे होता.
  -प्रणाली

 • smartsam 65w

  मास्क!

  आजकाल तर तू
  आहेस एकदम खास.
  खरा असो की खोटा
  मनातल नाही भान
  पण तोंडावर मास्क!

  बरं!
  असाच जर पडदा
  मनावर ही असता.
  वाईटाचा नसता मग
  घेतला कोणी रस्ता!

  डोळ्यांचा दोष नाही
  वाईट कटाक्षेला अवरेल का?
  मनाच्या ओघांचा मास्क
  सांगा कोणी बनवेल का?
  मनाच्या ओघांचा मास्क
  सांगा कोणी बनवेल का??


  ©smartsam

 • maskerajat 173w

  गर्द निळ्या आकाशाखाली,
  स्वप्न माझे शोधती नभास.
  तप्त कोरड्या भुई परी,
  व्यर्थ ती पावसाची आस.

  ©maskerajat