#krushnagatha

1 posts
 • hruchanilima 8w

  तुझ्या बासरीचे सूर
  आत्ता ऐकू आले मला..
  धावत होते सैरभैर मी
  तुझ्या भेटीच्या ओढीने...
  तू लबाड कान्हा
  तुला तर माझ्याशी बोलायचेच नाही..
  इतक्या अंधारल्या रातीला
  कुणीच लपंडाव खेळत नाही..
  पण माझ्या खोडी काढल्याशिवाय
  तुलाही करमत नाही..
  बरे केले होते यशोदा माईने
  जे बांधले तुला उखळाला..
  सांग ना रे मुकुंदा
  कशी हुडकू मी तुझ्या सावलीला...
  नको मला तुझे राधेसारखे प्रेम...
  हवी फक्त एक द्रौपदीला दिली होती
  तशी मर्मबंधातली ठेव...
  ये धावून माझ्या मदतीला
  जेव्हा मी असेल संकटात...
  घे सावरून तेव्हा मला,
  राखी नंतर बांधेन मी तुला एकट्यात...
  ~ऋचा निलिमा
  .
  .
  .
  .
  .
  .
  @shabdabawari

  #krushnagatha#krishna#rakshabandhanstatus#bonding#bondoflove#sibling#brotherhood#sisterhood#latepost#thoughtofmid#rakhi#rakhispecial��#dada#brothersisterlove#erotica#poemofinstagram#poetesstreding#wordporn#happiness#radheradhe#jaishreekrishna
  https://www.instagram.com/p/CS7LWIJq6m6/?utm_medium=share_sheet

  Read More

  ....

  राखी....  ©hruchanilima