Grid View
List View
Reposts
 • avyakt 48w

  तू

  दिसता तू मला मी गालातल्या गालात हसते
  तुझ्या या गोडं हसण्याला मी अजूनही फसते

  नजरेला तूझ्या नजर मिळता का अस घडतं
  मन माझं पुन्हा नव्यानं तुझ्याच प्रेमात पडतं

  त्या वळणावर तु मला असे मागे वळून पाहिले
  तुझ्यासाठी अधीर मन मी क्षणात तुला वाहिले

  अव्यक्त बोल तुझ्या मनाचे आज मला हि कळले
  त्या वळणावर पाऊल माझं तुझ्याच दिशेने वळले

  ©अव्यक्त ©avyakt

 • avyakt 48w

  काटा

  काट्याने काटा काढावा म्हणतोय
  पुन्हा एकदा प्रेम करावं म्हणतोय


  ©अव्यक्त ©avyakt

 • avyakt 50w

  ये आखरी अलविदा भी शायद
  मेरे मुकद्दर में ना-मुकम्मल हे
  उसी की तरहा...

  #shayri #avyakt

  Read More

  बेचैनी

  न जाने कितने बेचैन से लफ़्ज
  आज भी ऊस अलविदा में कैद रहे
  बेचैन कितने हे कैसे बया करे
  हम आखरी अलविदा तक ना कह सके

  ©अव्यक्त ©avyakt

 • avyakt 51w

  जाने कि जल्दी थी
  धिमा जहर पीला गया
  #avyakt #shayri

  Read More

  ये क्या किया

  मरने को निकले थे
  मोहोब्बत सीखा गया

  जान भी ले ली उसने
  और जिंदा भी छोड गया

  ©अव्यक्त ©avyakt

 • avyakt 55w

  कंटाळा नेमका कशाचा आला आहे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्याला टाळता येणं कठीण असतं.
  #thoughts #life #diary

  Read More

  कंटाळा

  आपण बाहेरच्या गोष्टीमध्ये इतके गुंतून गेलोय,की नेमका कसला कंटाळा आलाय हे पण कळत नाहीे.
  आपण स्वतःपासून लांब पळत असतो नेहमी.
  स्वतःचाच कंटाळा आलाय का ?
  आतमध्ये डोकावून पाहावं जरा.
  बाहेर फिरता येत नाही ना, मग जरा मनामध्ये फिरावं.
  आपले विचार तपासून पाहावे.
  आपले विचार आपल्याला गर्दीमध्ये एकटं पाडू शकतात तर तेच एकांतामध्ये सोबत सुद्धा करतात.
  कोणते विचार निवडावे हे आपणच ठरवायचं असतं.
  म्हणजे आपल्याला कंटाळा येणार नाही.

  ©अव्यक्त ©avyakt

 • avyakt 60w

  आपल्या आयुष्यात आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायच्या असतात. आपणही ते सगळं काही शिकण्याचा आपल्याला जमेल तसं प्रयत्न करत असतो. कधी त्याबद्दल वाचून, कधी बोलून, तर कधी इतरांना बघून आपण त्याबद्दल सगळी माहिती गोळा करत असतो.
  आपल्याला वाटतं, माहिती मिळवली म्हणजे आपण ती गोष्ट करायला शिकलो. पण खरं तर, तस काही नसतं.
  जोपर्यंत मिळालेल्या माहितिच्या मदतीने, आपण प्रत्यक्ष कृती करत नाही तोपर्यंत सगळं काही मनाचे खेळ.

  #avyakt #marathi #learning #fear #trust #life
  #moment #decision #inspiration #thoughts #diary

  Read More

  शिकणं

  पाण्याच्या काठावर उभं राहून, फक्त विचार करून,
  पोहणं शिकता येत नाही.
  त्यासाठी पाण्यात उतरावं लागतं.
  स्वतः अनुभव घ्यायला लागतो.
  काठावर का होईना, सराव करावा लागतो.
  हळूहळू उथळ पाण्यातून पूढे खोलआत जावं लागतं.
  पायाखाली आधार असे पर्यंत सर्व सोप्प वाटत असतं.
  या पुढे घ्यायची असते ती झेप. हा निर्णय आपला असतो.
  आपल्या स्वतःवरच्या विश्वासाची कस इथेच लागते.
  बुडेल, मरेल ही भीती असतेच. मागे फिरणं सोप्प असतं.
  हृदयाची वाढलेली धडधड स्पष्ट ऐकू येते.
  आपण एक दिर्घ श्वास आत घेऊन पुढे झेप घेतो.
  सर्व बाजूला पाणीच पाणी. कसलाच आधार नाही.
  आपण पाण्यावर तरंगत असतो.
  हृदयाची धडधड हळूहळू कमी होते.
  आता बुडून मरण्याची भीती नसते.
  हा क्षण मनात साठवला जातो.
  याआधी फक्त भीतीमुळे आपण कितीवेळा मागे गेलो,
  याचा विचार मनात येतो. हसायला येत.
  शिकणं चालूच राहतं.

  © अव्यक्त © avyakt

 • avyakt 73w

  हाल-ए-जिंदगी
  #avyakt #duality #ontheotherside #life #poetry

  Read More

  उस पार

  सिने में खंजर लिए वो महफ़िलों में फिरता रहा
  चेहरे कि मुस्कान के परे कोई देख पाता
  तो बात कुछ और थी

  मन में तुफान समेंटे वो सबकी सूनता रहा
  उसकी अनकही बातें कोई सून पाता
  तो बात कुछ और थी

  आँखो में अश्कों का सागर छुपाए हसता रहा
  वो रो कर असलीयत में हस पाता
  तो बात कुछ और थी

  तुटा हौसला और खुद को संभाले चलता रहा
  उसे प्यार से कोई सहारा दे पाता
  तो बात कुछ और थी

  इस पार वो हररोज मरता रहा
  उस पार भी मर पाता
  तो...

  @अव्यक्त ©avyakt

 • avyakt 77w

  फुलपाखरू

  पाहिलं तिला हसताना कि
  गालातल्या गालात हसतंय...
  पाहून तिची मोहक अदा
  बेभान होऊन नाचतंय...
  पहावे तिनेही एकदा प्रेमाने
  म्हणून काळीज हुरहूरतंय...
  एकतर्फी या प्रेमामध्ये
  रोज नव्याने मरतंय...
  कळेल का कधी तिला
  तिच्यासाठीही कोणीतरी झुरतंय...
  कळीला त्रास होऊ नये म्हणून
  एक वेडं फुलपाखरू
  बागेबाहेरच फिरतंय...

  ©अव्यक्त ©avyakt

 • avyakt 93w

  माणसं

  काही माणसं अशी असतात
  'ज्यांच्या' प्रेमात पडलं की
  बाहेर येता येतं नाही
  काही माणसं अशी असतात
  'ज्यांना' प्रेमात पडलं की
  बाहेर येता येतं नाही
  ©अव्यक्त ©avyakt

 • avyakt 94w

  त्याचं प्रेम नक्की कोणावर असतं ?

  नक्की काय घडतं? कोणी सांगेल का?

  (पतंग- फुलपाखरासारखंच काहीसं, त्याच जातीतलं पण निशाचर.)
  #bonfire #moth #flame #intense #love #rage

  Read More

  शेकोटी आणि पतंग

  रात्रीच्या वेळी मित्रांसोबत शेकोटी जवळ गप्पा मारत बसलो होतो.
  तेवढ्यात अचानक दूर कुठुन तरी, एक इवलासा पतंग उडत आला आणि त्याने आगीमध्ये स्वतःला झोकून दिले.
  मनात एक विचार चमकून गेला की, का केलं असावं त्याने असं?

  आग त्याला जाळणार हे माहित असून तीच्या जवळ जाण्याचा मोह आवरता येत नाही त्याला.
  एक अनामिक ओढ असते त्याच्यात, तीच्या जवळ जाण्याची, स्वतःला झोकून देण्याची, जळण्याची.
  हेच सगळं ऐकलं होतं पतंगाबद्दल.
  पण हा मोह आवरला तर?
  आगीपासून लांब गेलं तर?
  जगला असता तो?
  कदाचित हो.
  काही क्षण.
  पण तीची ओढ जगू देत नाही त्याला.
  जिवंतपणी मरण यातना भोगण्यासारखं दुःख ते.
  त्यापेक्षा तो मरण पत्करतो.
  मरण म्हणावं का याला?
  की मोक्ष म्हणावं?
  नक्की काय होत असतं?
  इतकं प्रेम असतं का तिच्यावर त्याचं?
  इतकं की स्वतःचा विचार न करता त्यात स्वतःला झोकून देतो तो.
  की राग?
  राग असतो का त्यात?
  आपलं ज्यावर प्रेम आहे अश्या काळोखाला, तीच्या उजेडाने त्रास झाल्याचा राग?
  राग इतका की त्याला काहीच सुचत नाही आणि तो, ती आग विझवण्यासाठी स्वतःचा विचार न करता स्वतःला झोकून देतो त्यात.

  त्याचं प्रेम नक्की कोणावर असतं ?
  नक्की काय घडतं कोणी सांगेल का?

  ©अव्यक्त ©avyakt