aditi_m_d

insta id :- _kavyarasik_

Grid View
List View
Reposts
 • aditi_m_d 78w

  मी आणि पाऊस

  आज पुन्हा तो पाऊस
  मज वेड लावून गेला...
  सुकलेल्या आठवणींना ओल्या करून
  मनास माझ्या पुन्हा न्हाऊन गेला...

  ओझरत्या क्षणांचे हसू
  चेहऱ्यावर पुन्हा तो फुलवून गेला...
  दुःखात ओघळत्या अश्रूंना
  नकळत माझ्या लपवून गेला...
  आज पुन्हा तो पाऊस
  मज वेड लावून गेला...

  उंच नभ दाटून येता
  मलाच का तो भुलवून गेला...
  पृथ्वीवरती अवतरता मग
  कवितेत माझ्या गुंफून गेला...
  आज पुन्हा तो पाऊस
  मज वेड लावून गेला...

  सरसर साऱ्या थेंबांचा स्पर्श
  मज ओला चिंब भिजवून गेला...
  हरवून गेले त्या क्षणात साऱ्या
  उगाच का मज थिजवून गेला...
  आज पुन्हा तो पाऊस
  मज वेड लावून गेला...
  ©aditi_m_d

 • aditi_m_d 79w

  वाट पाहतोय

  वाट पाहतोय आम्ही
  दिवसभर दमून घरी
  आल्यावर शांतपणे निजायची...
  वाट पाहतोय आम्ही
  पुन्हा नव्याने जगायची...
  ©aditi_m_d

 • aditi_m_d 82w

  Searching the moon
  I was looking at the sky,
  Suddenly the moon stared at me
  I don't know why...
  It was the moon watching me
  constantly from miles away,
  May the moon was sitting
  beside me I always pray...
  ©aditi_m_d

 • aditi_m_d 84w

  Aashna

  E ashna aapke lehje mai
  gazab ka sukoon hai...
  Aur aapki ruhaaniyat mai
  Ek nayaab afsoon hai...

  Aarzoo thi ki sirf ek baar rehna
  humaare saath tasveer mai...
  Lekin khushnasib h hum Khuda
  ne aapko likha h humare taqdeer mai...
  ©aditi_m_d

 • aditi_m_d 89w

  असाच आहे तो!

  तो ना असाच आहे
  कधीतरी उगाच माझी फिरकी घेईल,
  मग माझा रुसवा घालवायला
  हळूच माझ्या जवळ येईल...

  त्याचा दिवस जर खराब गेला तर
  त्याला ती गोष्ट आधी मला सांगायची असते,
  त्याचा दिवस किती खराब गेला तरी माझ्या चेहऱ्यावरची स्मितरेषा त्यालाच पाहायची असते...
  असाच आहे तो...

  मी नेहमी शांत असते
  पण त्याला माझं बोलणं ऐकायच असतं,
  माझा अबोला त्याला बघवतच नाही कारण
  त्याला माझ्या शब्दांच्या ओघात वाहायचं असतं...
  असाच आहे तो...

  कधी मी त्याच्याकडे नुसतं बघत बसते
  पण तो मात्र नजरेस नजर मिळवणं टाळतो,
  मी कधी थोडी लाडात आले
  तर माझा वेंधळेपणा सुद्धा तोच सांभाळतो...
  असाच आहे तो...
  ©aditi_m_d

 • aditi_m_d 89w

  तुम्ही ऐकलंच असेल ना
  जाणू पृथ्वीवर एक राक्षस आला आहे,
  त्याच्यामुळे अवघ्या जगाचा
  गोंधळच उडाला आहे...

  उद्यानं, दुकानं, नाट्यगृह
  सारं जग गेलं आहे थांबून,
  कस झालंय ना आपल्या
  घरात आप्ल्यालाच ठेवलाय डांबून...

  आता मिळते थोडी विश्रांती
  तर ऑफिसच्या कामाने का तो रडत आहे,
  त्या राक्षसाला हरवायला
  सारं जग एक होऊन लढत आहे...

  ठप्प झालंय सारं काही
  आता रस्त्यावर दिसत नाही रहदारी,
  कारण जागोजागी निघाली आहे
  त्या राक्षसाची स्वारी...

  शांत राहा जरा आता
  खूप खेळलात निसर्गाशी खेळी,
  घरी राहणेच योग्य आहे
  आता वाघाची झालीय शेळी...
  ©aditi_m_d

 • aditi_m_d 101w

  आठवण

  नकळत ती आठवण माझ्या
  डोळ्यांसमोर येऊन गेली,
  उगाच का ती मला माझ्या
  भूतकाळात घेऊन गेली...

  आनंदाचे सारे क्षण ते तसेच्यातसे
  समोर माझ्या उभे राहिले,
  हरवून गेले मी आठवणीत त्या
  मलाच मी हसताना पहिले...

  अशी अलगद झालेली ती आठवण
  चेहऱ्यावरती माझ्या हास्य फुलवून गेली,
  कळेलच नाही माझे मला कधी
  ती माझा वर्तमान मला भुलवून गेली...
  ©aditi_m_d

 • aditi_m_d 102w

  काळात विरलेल्या क्षणांना
  आज पुन्हा जगायचं आहे...
  त्याच क्षणांमध्ये हरवून
  थोडं आणखी हसायचं आहे...!
  ©aditi_m_d

 • aditi_m_d 111w

  जाणावते जेव्हा
  आयुष्यातलं सुख कुठेतरी हरवलेलं असत
  तेव्हा वाटते असेही,
  नियतीने काहीतरी खास लिहून ठेवलेलं असत!
  ©aditi_m_d

 • aditi_m_d 115w

  कोणास ठाऊक त्या
  किनाऱ्यावर काय गुपित दडले होते
  त्या दृश्याचे वर्णन करताना
  माझे शब्ददेखिल अपुरे पडले होते...!
  ©aditi_m_d